4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 9 AM | 1 October 2022 -TV9

| Updated on: Oct 01, 2022 | 10:12 AM

राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्यासह दोघांवर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चेंबूर पोलीसांत ललीतकुमार टेकचंदाणी यांनी यांच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे.

Follow us on

आजपासून देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. तर राज्यातील मुंबई, पुण्यासह देशातील 13 शहरात 5G सेवा सुरू होईल. मुंबईमध्ये रिक्षा- टॅक्सी भाडेवाढ करण्यात आली आहे. रिक्षाच्या भाड्यात 2 रूपये आणि टॅक्सी भाड्यात 3 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यातील 60 सीनजी पंप कमीशन वाढ मिळाल्याने बंद राहणार आहेत. तर मुंबईमध्ये आज पासून मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई होणार आहे. तर राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्यासह दोघांवर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चेंबूर पोलीसांत ललीतकुमार टेकचंदाणी यांनी यांच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे. तर राज्यात आता हिंदुत्वाचं सरकार आहे हे याद रखना असं म्हणत नितेश राणे यांनी भूजबळांच निशाणा साधला आहे.