Dasara Melava 2022 : मुंबईला पोहोचण्याआधीच शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने

| Updated on: Oct 05, 2022 | 4:46 PM

नाशिक-मुंबई महामार्गावर शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे.

Follow us on

Dasara Melava 2022 : मुंबईत आज ठाकरे आणि शिंदे गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava)  होणार आहे. त्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक हे मुंबईकडे रवाना होत आहेत. त्यामध्येच नाशिक-मुंबई महामार्गावर ( Nashik-Mumbai Highway) शिवसेना आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. हे सर्व कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने जात असताना महिलांच्या दोन गटामध्ये हा राडा झाला आहे. त्यानंतर काही वेळ तिथे तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. त्याच वेळी परिसरातील बंदोबस्तासाठी असणारे पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी हा वाद मिटवला.

आज सर्वत्र दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. पण सध्या दोन दसरा मेळाव्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. एक म्हणजे परंपरेनुसार होणारा शिवाजीपार्कवरील उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा. ज्या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक शिवाजीपार्कवर जमा होऊन उद्धव ठाकरेंच्या विचारांचं सोन लुटायला येत असतात. तर बीकेसी मैदानावर या वर्षी नव्याने शिंदे गटाचा देखील दसरा मेळावा होत आहे. त्यासाठी राज्यभरातून लाखो शिवसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. हा दसरा मेळावा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.