Sindhudurg जिल्ह्यातील Kankavliमध्ये प्रत्येक नाक्यावर, चौकात मोठा पोलीस बंदोबस्त

| Updated on: Jan 31, 2022 | 2:08 PM

नितेश राणें(Nitesh Rane)च्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असतानाच कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. नाक्यानाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्य राखीव दल व दंगल नियंत्रण पथकं तैनात करण्यात आली आहेत. संतोष परब (santosh parab) हल्लाप्रकरणी ते अडचणीत आले आहेत.

Follow us on
सिंधुदुर्गातली महत्त्वाची बातमी आहे. नितेश राणें(Nitesh Rane)च्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू असतानाच कणकवलीत पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. नाक्यानाक्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. राज्य राखीव दल व दंगल नियंत्रण पथकं तैनात करण्यात आली आहेत. पटवर्धन चौक व नरडवे नाका या शहरातल्या मुख्य चौकात पोलिसांची पथकं तैनात करण्यात आलीत. संतोष परब (santosh parab) हल्लाप्रकरणी अडचणीत आलेले भाजपा आमदार नितेश राणे 28 जानेवारी रोजी कोर्टाला शरण आले. यावर आता आज सुनावणी होत आहे. नितेश राणे यांच्या जामीन (Anticipatory bail) अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने नितेश यांना दहा दिवसात शरण येण्यास सांगितले होते. तसेच कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेशही देण्यात आले होते. मात्र, तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर नितेश यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती.