किशोरी पेडणेकर यांनी कोणाचा चिमटा काढला? काय म्हणत पलटवार केला शालिनी ठाकरेंवर, पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये

किशोरी पेडणेकर यांनी कोणाचा चिमटा काढला? काय म्हणत पलटवार केला शालिनी ठाकरेंवर, पहा महाफास्ट न्यूज 100 मध्ये

| Updated on: Oct 15, 2022 | 7:24 PM

मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अनुपस्थितीवरून मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच अंधारात तीर मारणाऱ्यांमुळेच मूळ शिवसैनिकांचे वांदे होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 20 मिनिटं चर्चा झाली. यावेळी ठाकरे-शिंदेंमध्ये राज्यातील सध्य राजकीय घडामोडींसह अंधेरी पोटनिवडणुकीवर चर्चा ही झाल्याचे कळत आहे. तर अंधेरी पोटनिवडणुकीची रणधुमाळी ही सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी पोटनिवडणुकीच्या प्रचारालाही सुरूवात केली आहे. हातात मशाल घेऊन त्यांनी त्यांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे. यादरम्यान मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अनुपस्थितीवरून मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी टीका केली आहे. तसेच अंधारात तीर मारणाऱ्यांमुळेच मूळ शिवसैनिकांचे वांदे होत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर किशोरी पेडणेकर यांनी पटलवार केला आहे. त्यांनी सुषमा अंधारे आल्याने इतरांच्या डोळ्यावर अंधारी आल्याचे म्हटलं आहे.

Published on: Oct 15, 2022 07:24 PM