MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 11 AM | 1 October 2022 -TV9

| Updated on: Oct 01, 2022 | 11:32 AM

रिक्षाच्या भाड्यात 2 रूपये आणि टॅक्सी भाड्यात 3 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

Follow us on

राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्यावर धमकी दिल्याप्रकरणी चेंबूर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यासह दोघांवर चेंबूर पोलीसांत ललीतकुमार टेकचंदाणी यांनी यांच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे. मुंबईमध्ये रिक्षा- टॅक्सी भाडेवाढ करण्यात आली आहे. रिक्षाच्या भाड्यात 2 रूपये आणि टॅक्सी भाड्यात 3 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर आज मुंबईत मराठी पाट्या नसलेल्या दुकांनावर कारवाई होणार आहे. पुण्यातील 60 सीनजी पंप कमीशन वाढ मिळाल्याने बंद राहणार आहेत. तर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घणाघात केला आहे. तसेच त्यांनी शिंदे यांच्या घरातील घराणेशाही गेल्या 8 वर्षांपासून पाहत असल्याचे म्हटलं आहे. तर तर शिंदे गटाने जाहिर केलेल्या कार्यकारणीवरून किशोरी पेडणेकर शिंदेंवर निशाना साधला आहे. तर ठाकरेंची घराणेशाही मग तुमची कुठली शाही असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला आहे.