MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 1 October 2022 -TV9

| Updated on: Oct 01, 2022 | 9:19 AM

शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. तसेच धनुष्यबाण चिन्ह गेलं तर सेनेकडं पाच आमदार ही राहणार नाहीत असेही त्यांनी म्हटलं आहे.

Follow us on

आजपासून देशात 5G सेवा सुरू होणार आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह देशातील 13 शहरात 5G सेवा सुरू होणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. तर मुंबई करांच्या खिशाला आज पासून कात्री लागणार आहे. मुंबईमध्ये रिक्षा- टॅक्सी भाडेवाढ करण्यात आली आहे. रिक्षाच्या भाड्यात 2 रूपये आणि टॅक्सी भाड्यात 3 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर शिंदे गटाने जाहिर केलेल्या कार्यकारणीवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदेंवर हल्ला केला आहे. तर ठाकरेंची घराणेशाही मग तुमची कुठली शाही असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला आहे. तर शिंदे गटाच्या गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेला डिवचले आहे. तसेच धनुष्यबाण चिन्ह गेलं तर सेनेकडं पाच आमदार ही राहणार नाहीत असेही त्यांनी म्हटलं आहे. ड्युप्लिकेट शिंदेवर गुन्हा दाखल करण्याप्रकरणी न्यायालयाने आता पुणे पोलिसांना नोटीस पाठवली आहे. दरम्यान नवरात्रीनिमित्त कोल्हापूरच्या अंबाबाईची गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली आहे.