सत्ता संघर्षादरम्यान नितीश, उद्धव भेटीचं नेमकं कारण काय?

| Updated on: May 11, 2023 | 2:32 PM

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

Follow us on

मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काहीसा दिलासा देणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. मात्र 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे गेलं आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची धाकधूक अजूनही शिंदे गाटाला लागली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. यादरम्यान त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्यामुळे केंद्रीय राजकारणात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर याभेटीवर ठाकरे यांनी, नितीशकुमार आणि तेजस्वी यादव योग्य वेळी आले आहेत. लोकशाहीची कशी हत्या केली जाते हे आज सर्वोच्च न्यायालयात सिद्ध झाले. माझा लढा देश आणि माझ्या राज्यासाठी आहे. राजकारणात वाद होतच असतात. पण हा देश आपल्याला वाचवायचा आहे, असा निर्धार केल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच संविधान वाचवायचे आहे. तुम्ही (नितीशकुमार) देशभर फिरत आहात, तुम्ही इथेही आला आहात. सर्व मिळून देश वाचवू. काही लोकांना पुन्हा देश गुलाम बनवायचा आहे, आम्ही त्यांचा पराभव करून त्यांना घरी पाठवू. आम्हाला खात्री आहे की संपूर्ण जनता आमची वाट पाहत आहे.