म्याव म्याव, आवाज तरी नीट कर, नितेश राणे यांनी पुन्हा आदित्य ठाकरे यांना डिवचले

| Updated on: Feb 08, 2023 | 12:02 PM

गेल्या सरकारचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाला स्थानिक आमदार यांना स्थानिक लोकांचे प्रेम मिळवता आले असते. पण हे प्रेम मिळविण्यासाठी नशीब लागते. कर्तृत्व लागते.

Follow us on

मुंबई : विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शनास बसले असताना आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहून ‘म्याव, म्याव’ म्हणणे भाजप आमदार नितेश राणे यांना चांगलेच भोवले होते. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्याच नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे याना पुन्हा ‘म्याव, म्याव’ म्हणत डिवचले आहे. वरळी येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत बोलताना नितेश राणे यांची जीभ पुन्हा घसरली. मला कमी बॉलमध्ये जास्त रन बनवायची सवय आहे, असा टोला त्यांनी लगावला. गेल्या सरकारचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या मुलाला स्थानिक आमदार यांना स्थानिक लोकांचे प्रेम मिळवता आले असते. पण हे प्रेम मिळविण्यासाठी नशीब लागते. कर्तृत्व लागते. स्वतःच्या मतदार संघाचे प्रश्न सोडविण्यासाठी ताकद नाही. हिमंत नाही. तर ती आमदारकी फक्त मिरवायला ठेवली आहे का? मतदारसंघात लक्ष नाही आणि राज्यस्तरीय म्याव म्याव करायचे काम सुरु आहे. आवाज तरी नीट कर, आवाज कुठून निघतो याचा थांगपत्ता नाही. अजून कंठ फुटला नाही तर जोरजोरात बोलण्याची भाषा करतोय. आव्हान देण्याची भाषा देतो. कोकणात ग्राम पंचायत लढवायला देईन तेवढी जिंकता येते का बघ नाही तर घरी जा. मतदारसंघातील एक शाखाप्रमुख, दहा पदाधिकारी यांची नावे सांग, काहीही हरेन, असा शब्दात नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.