काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या, नाना पटोले यांच्या समर्थनासाठी विदर्भ, मराठवाडा एकवटला

| Updated on: Feb 11, 2023 | 8:59 AM

सत्यजित तांबे यांच्यापाठोपाठ त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनीही नाना पटोले यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील मुंबईत दाखल होत आहे.

Follow us on

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात या कॉंग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये वाद सुरु झाला आहे. सत्यजित तांबे यांच्यापाठोपाठ त्यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनीही नाना पटोले यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील मुंबईत दाखल होत आहे. अशातच आता नाना पटोले यांच्या समर्थनासाठी काँग्रेसचे काही नेते दिल्ली येथे हायकमांडची भेट घेणार आहेत. त्याचवेळी दिल्लीतील काही बड्या नेत्यांनाही ते भेटणार आहेत. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील हे नेते असून त्यांनी हायकमांडकडे भेटीची वेळ मागितली आहे.