“मुंबईत जिथे महापुरुषांचे पुतळे त्या 140 ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवणार”, भाजपची घोषणा

| Updated on: Sep 29, 2022 | 12:20 PM

मुंबईत जिथे-जिथे महापुरुषांचे पुतळे आहेत. त्या 140 ठिकाणी स्वच्छता मोहीम भाजकडून राबवण्यात येणार आहे.

Follow us on

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीआधी भाजपने मोठी घोषणा केली आहे. मुंबईत जिथे-जिथे महापुरुषांचे पुतळे आहेत. त्या 140 ठिकाणी स्वच्छता मोहीम भाजकडून (Mumbai BJP) राबवण्यात येणार आहे. तशी घोषणा खासदार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. उत्तर मुंबई ही महापुरुषांची हब आहे. ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत. त्या ठिकाणी आम्ही स्वच्छता मोहिम राबणार आहोत, अशी घोषणा शेट्टी (MP Gopal Shetty) यांनी केली आहे. मुंबईतील कांदिवली पोयसर जिमखाना इथल्या नेताजी सुभाष चंद्रबोस यांच्या पुतळ्याची स्वच्छता करून खासदार गोपाळ शेट्टी यांनी स्वच्छता अभियानाची सुरुवात केली.