युतीला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचा गुलाबराव पाटलांकडून समाचार

| Updated on: Apr 01, 2023 | 8:02 AM

गुलाबराव पाटलांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुका या युतीबरोबरच लढवणार असल्याचे स्पष्ट केले

Follow us on

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून आम्ही भाजपबरोबर आलेलो असून ज्यांना मोदीचे नेतृत्व मान्य नसेल ते आम्हाला विरोध करतील असे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. छोट्या-मोठ्या निवडणुकीसाठी काही जन राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसत असतील तर हा मोदींना धोका असल्याचे म्हणत त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना चांगलच फैलावर घेतलं. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत युतीला विरोध काही भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

गुलाबराव पाटलांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत बाजार समितीच्या निवडणुका या युतीबरोबरच लढवणार असल्याचे स्पष्ट केले. तर भाजपच्या गटातून युतीला काहींनी विरोध केला होता. या विरोध करणाऱ्यांचा गुलाबराव पाटलांनी चांगला समाचार घेतला. तर या भाषणादरम्यान गुलाबराव पाटलांनी नागपूर टू दादर अकेला गुलाबराव फादर असे म्हणत विकासासाठी आम्ही उठाव केल्याचा पुनरुच्चार गुलाबराव पाटलांनी केला.