Video : गिरीश बापट कुठंही उभं राहिले तरी ते निवडून येतात- शरद पवार

| Updated on: May 08, 2022 | 2:52 PM

गिरीश बापट कुठंही उभं राहिले तरी ते निवडून येतात, ते निवडून कसे येतात, त्याचं रहस्या काय आहे हे मला माहित नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलंय. महापालिकेत काम करताना अनेक गमतीदार किस्से घडत असतात. कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो, असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुण्यात शिकत असताना […]

Follow us on

गिरीश बापट कुठंही उभं राहिले तरी ते निवडून येतात, ते निवडून कसे येतात, त्याचं रहस्या काय आहे हे मला माहित नाही, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटलंय. महापालिकेत काम करताना अनेक गमतीदार किस्से घडत असतात. कोणी कधी काय काम सांगेल याचा भरवसा नसतो, असं शरद पवारांनी सांगितलं. यावेळी त्यांनी पुण्यात शिकत असताना महापालिकेत काय काम चालतं हे माहिती होत, नगरसेवकांशी माझा संपर्क असायचा, असंही सांगितलं. निमित्त होतं अंकुश काकडे (ankush kakde) लिखित ‘हॅशटॅग पुणे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी अभिनेते नाना पाटेकर, खासदार श्रीनिवास पाटील, गिरीश बापट, वंदना चव्हाण, उल्हास पवार आदी उपस्थित होते.