शिंदे गटाचा नवा प्लॅन तयार! दसरा मेळाव्याच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान ? 

| Updated on: Sep 24, 2022 | 2:05 PM

दसरा मेळावा प्रकरणात आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सोमवारी उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Follow us on

मुंबई :  दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या ( Shiv Sena) वतीने उच्च न्यायालयात (High Court) याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली. उच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या बाजुने लागला. न्यायालयाकडून त्यांना शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता याविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. सोमवारी उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यासाठी वरिष्ठ वकिलांची फौज तयार करण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.  तातडीची सुनावणी घेण्यासाठी शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.