“येत्या काळात शिवसेनेची अवस्था खूप वाईट होईल”, गिरीश महाजनांचा टोला

| Updated on: Mar 10, 2022 | 5:44 PM

उत्तर प्रदेश, (Uttarakhand Election) गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत (Assembly Result) भाजपला घवघवीत यश मिळालं असून पंजाबमध्ये ‘आप’नं बाजी मारली आहे.

Follow us on

उत्तर प्रदेश, (Uttarakhand Election) गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुकीत (Assembly Result) भाजपला घवघवीत यश मिळालं असून पंजाबमध्ये ‘आप’नं बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत विरोधकांना एकत्र आणून भाजपला रोखण्याचा शिवसेनेनं आणि पर्यायानं महाविकास आघाडीनं प्रयत्न केला होता. पण, तो प्रयत्न फासल्याचं दिसून आलं. भाजपविरोधात (BJP) मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) आघाडीवर होते. आता यावर आणि 5 राज्यांमधील विधानसभेच्या निकालांवर भाजपा नेते गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या काळात शिवसेनेची अवस्था खपू वाईट होईल, असं महाजन यावेळी म्हणाले. शिवसेनेला काही म्हणू दिया. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊता यांनी कमी बोलावं आणि काम जास्त करावं, असा टोलाही महाजन यांनी यावेळी राऊतांना लगावलाय. ही तर फक्त झांकी आहे महाराष्ट्र अभी बाकी आहे, असा इशाराही गिरीश महाजन यांनी यावेळी दिलाय.