100 SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 1 October 2022 -TV9

| Updated on: Oct 01, 2022 | 9:45 AM

पु्ण्यातील चांदणी चौकातील पूल आज मध्य रात्री पाडण्यात येणार आहे. यानंतर आठ दिवसात वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. तर हा पूल पाडल्याने सुमारे 5 हजार जड-अवजड वाहनं थांबतील.

Follow us on

आजपासून देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. तर राज्यातील मुंबई, पुण्यासह देशातील 13 शहरात 5G सेवा सुरू होईल. पु्ण्यातील चांदणी चौकातील पूल आज मध्य रात्री पाडण्यात येणार आहे. यानंतर आठ दिवसात वाहतूक सुरळीत करण्याच्या सुचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या आहेत. तर हा पूल पाडल्याने सुमारे 5 हजार जड-अवजड वाहनं थांबतील. तर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर आरोप केला आहे. त्यांनी आरोप करताना शिंदेंनी प्रत्येक जिल्ह्याला 1 कोटी रूपये दिले आहेत. तर पैसे देऊन मेळाव्याला गर्दी जमवली जात असतल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर मुंबईत जाहीर करण्यात आलेल्या शिंदे गटाच्या युवासेना कार्यकारणीतून पूर्वेश सरनाईकांना डावलण्यात आलं आहे.