अंधेरी पोटनिवडणूकीचे पडघम वाजले… पहा काय आहेत नवीन अपडेट सुपरफास्ट 50 न्यूज मध्ये

| Updated on: Oct 15, 2022 | 7:28 PM

ठाकरे गटाकडून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला जाणार आहे. माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी पटेल यांच्यावर आक्षेप घेत काही कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत.

Follow us on

सध्या राज्यात सत्तांतरानंतर आता अंधेरी पोटनिवडणूकीचे पडघम वाजत आहेत. त्याच दरम्यान मी पुन्हा येईन असे म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा आलो असे कार्यक्रमात म्हटलं आहे. तर भाजप नेते आशिष शेलार यांचे नाव घेत त्यांना काही पॉलिसी तयार केल्या मात्र सरकार बदललं आणि त्या राहिल्या. मात्र त्यांच्याच पॉलिसीत मी पुन्हा येईन हे ही होतं आणि तसं ते झालही, असे फडणवीस म्हणाले. याचदरम्यान अंधेरी पोटनिवडणूकीत नवा ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाकडून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप नोंदवला जाणार आहे. माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी पटेल यांच्यावर आक्षेप घेत काही कागदपत्र निवडणूक आयोगाकडे सादर करणार आहेत. तर अंधेरी पोटनिवडणूकीची रणधूमाळीही सुरूवात झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंकडून प्रचाराला सुरूवात केली. यावेळी त्यांनी पुर्वीप्रमाणेच यावेळीही आपल्याला प्रतिसाद मिळत असल्याचं म्हटलं आहे.