ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा बंद राहणार, कधी-कोठे? वाचा…

| Updated on: May 12, 2023 | 8:03 AM

या पाणी पुरवठा योजनेच्या नवीन टाकलेल्या मुख्य जलवाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार, 12 मे ते शनिवार, 13 मे दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा, पाणीपुरवठा बंद राहणार, कधी-कोठे? वाचा…
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे : महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा मानपाडा व वागळे (काही भाग) प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाणी पुरवठा योजनेच्या नवीन टाकलेल्या मुख्य जलवाहिन्या कार्यान्वित करण्याचे तातडीचे काम हाती घेतल्यामुळे शुक्रवार, 12 मे ते शनिवार, 13 मे दुपारी 12 वाजेपर्यंत 24 तासासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शनिवारी पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल याची कृपया नागरीकांनी नोंद घ्यावी. तरी नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.