TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 1 October 2022 -TV9

| Updated on: Oct 01, 2022 | 10:42 AM

नितेश राणे यांनी भूजबळांच नाव न घेता, राज्यात आता हिंदुत्वाचं सरकार आहे हे याद रखना असं म्हणत इशारा दिला आहे.

Follow us on

आजपासून देशात 5G सेवा सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ सकाळी 10 वाजेपर्यंत होणार आहे. मुंबईमध्ये रिक्षा- टॅक्सी भाडेवाढ करण्यात आली आहे. रिक्षाच्या भाड्यात 2 रूपये आणि टॅक्सी भाड्यात 3 रूपयांनी वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भूजबळ यांच्यासह दोघांवर धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा चेंबूर पोलीसांत ललीतकुमार टेकचंदाणी यांनी यांच्या तक्रारीवर दाखल करण्यात आला आहे. यानंतर नितेश राणे यांनी भूजबळांच नाव न घेता, राज्यात आता हिंदुत्वाचं सरकार आहे हे याद रखना असं म्हणत इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचा दौरा करणार आहेत. ते गडचिरोली आणि वर्धा येथे जाणार आहेत. तसेच DPDCची बैठक ही घेणार आहे. मनसे आमदार राजू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. तर पाटील यांनी शिंदे यांच्या घरातील घराणेशाही गेल्या 8 वर्षांपासून पाहत असल्याचे म्हटलं आहे. तर त्यात काही नवीन नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.