उदय लळीत देशाचे नवे सरन्यायाधीश

उदय लळीत देशाचे नवे सरन्यायाधीश

| Updated on: Aug 27, 2022 | 11:56 AM

देवगड तालुक्यातील गिर्ये कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडीलांनी वकीलीसाठी गाव सोडून ते सोलापूरला स्थायीक झाले होते, तर उदय लळीत यांनी आपले शिक्षण आणि वकीलीची प्रॅक्टीस मुंबईतून केली आहे.

सरन्यायाधीश एम. व्ही. रमण्णा आज निवृत्त होत आहेत, त्यांच्यानंतर या महत्त्चाच्या पदावर महाराष्ट्राचे सुपूत्र न्यायमूर्ती उदय उमेश लळीत देशाचे नव सरन्यायाधीश विराजमान झाले आहेत. सरन्यायाधीश पदाच जबाबदारी घेण्यापूर्वी त्यांना भारताचे राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी त्यांना शपथ दिला आहे. सरन्यायाधीश पदावर विराजमान होणारे उदय लळीत यांनी देशातील अनेक महत्वाचे खटले त्यांनी चालवले आहेत. टू जी स्पेक्ट्रमसारख्या मोठ्य घोटाळ्यात त्यांनी ईडीकडून अभियोगाची जबाबदारी सांभाळली होती. महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र असेलेले उदय लळीत हे कोकणाती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून देवगड तालुक्यातील गिर्ये कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव असून त्यांच्या वडीलांनी वकीलीसाठी गाव सोडून ते सोलापूरला स्थायीक झाले होते, तर उदय लळीत यांनी आपले शिक्षण आणि वकीलीची प्रॅक्टीस मुंबईतून केली आहे.

Published on: Aug 27, 2022 11:56 AM