Agricultural Pump: राज्य सरकारचा असा शॉक… शेतकऱ्यांना तेलंगणाच्या सीमेलगतच घ्यावी लागली जमीन, काय आहेत कारणं?

| Updated on: Mar 25, 2022 | 5:34 PM

राज्यात सातत्याने कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा असा काय परिणाम झाला आहे त्याचा विचारही कोणी केला नसेल. यंदा तर ऐन रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत केल्याने याची झळ अधिक तीव्र होती. आतापर्यंत कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप इथपर्यंतचेच परिणाम आपल्याला माहिती होते. मात्र, तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेली माहिती फार धक्कादायक आणि राज्यासाठी लाजिरवाणी आहे.

Agricultural Pump: राज्य सरकारचा असा शॉक... शेतकऱ्यांना तेलंगणाच्या सीमेलगतच घ्यावी लागली जमीन, काय आहेत कारणं?
Follow us on

मुंबई : राज्यात सातत्याने (Agricultural Pump) कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत होण्याचा असा काय परिणाम झाला आहे त्याचा विचारही कोणी केला नसेल. यंदा तर ऐन (Rabi Season) रब्बी हंगामात विद्युत पुरवठा खंडीत केल्याने याची झळ अधिक तीव्र होती. आतापर्यंत कृषी पंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे राज्य सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील आरोप-प्रत्यारोप इथपर्यंतचेच परिणाम आपल्याला माहिती होते. मात्र, (Telangana) तेलंगणाच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलेली माहिती फार धक्कादायक आणि राज्यासाठी लाजिरवाणी आहे. महाराष्ट्रात सुरळीत विद्युत पुरवठा होत नाही म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी थेट तेलंगणाच्या सीमेलगतच शेत जमिनी घेतल्या आहेत. येथेच बोअरवेल खोदून पुन्हा शेतीला पाणी पुरवठा करीत आहेत. सत्ताधारी आणि आता विरोधी बाकावर बसलेले पक्ष हे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात अयशस्वी ठरले आहेत. यामुळे सीमालगतच्या शेतकऱ्यांवर ही वेळ आली आहे. तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरीश राव यांनी दिलेल्या धक्कादायक माहितीनंतर का होईना तोडगा काढला जातो का हे पहावे लागणार आहे.

आठ तास विद्युत पुरवठा तो ही टप्प्याटप्प्याने..

रब्बी हंगाम हा पूर्णपणे साठवणूक केलेल्या पाण्यावर अवलंबून असतो. यंदा पोषक वातावरण आणि मुबलक पाणी यामुळे टंचाई भासणार अशी स्थिती होती. मात्र, पिके बहरात असतानाच महावितरणकडून कृषी पंपाचा विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आला होता. यंदाच नाही तर दरवर्षी शेतकऱ्यांची अशी अडवणूक केली जात आहे. यंदा तर कृषीपंपसाठी 8 तासच विद्युत पुरवठा तो ही दोन टप्यामध्ये. त्यामुळे उत्पादनात घट आणि शेतकऱ्यांच्या परीश्रमात वाढ झाली होती. शेतकरी हिताचे निर्णय घेतले जातात पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांवर अशाप्रकारची नामुष्की ओढावत आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सत्ताधारी-विरोधक असमर्थ

निवडणुकांच्या तोंडावर आणि अर्थसंकल्पात केवळ शेतकऱ्यांप्रती सहानभूती दाखवली जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन विविध घोषणा करण्यात आल्या असल्या तरी मूलभूत असणाऱ्या विजेचा प्रश्न सरकारकडून मार्गी लावला जात नाही. महाविकास आघाडीच नाही तर यापूर्वीच्या सरकारनेही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचा प्रश्न निकाली काढलेला नव्हता.

बोअरवेलच्या माध्यमातून शेतीला पाणी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केवळ शेतीला नियमित वीज उपलब्ध होऊन पिकांना पाणी मिळावे या उद्देशाने तेलंगणात शेतजमिन घेतली आहे. आता याच शेती क्षेत्रात बोअरवेल घेऊन पिकांना पाणी दिले जात आहे. केवळ कृषी पंपाला सुरळीत विद्युत पुरवठा नसल्यामुळे काय वेळ येऊ शकते याचे उदाहरण म्हणजे तेलंगणा सीमेलगतचे हे शेतकरी.

संबंधित बातम्या :

Agricultural : कृषी विभागात महाघोटाळा, कॉंग्रेसच्या नेत्याची अधिकाऱ्याविरोधात ‘ईडी’ कडे तक्रार

Chickpea: दरवर्षीचीच बोंब, बारदाण्याअभावी रखडली हमीभाव केंद्रावरील खरेदी, शेतकरी Massage च्या प्रतिक्षेत

Latur Market : आवक सोयाबीन अन् हरभऱ्याची चर्चा मात्र तुरीची, हंगामाच्या अंतिम टप्प्यात बदलले चित्र?