अमरावतीच्या तरुण शेतकऱ्यांची भन्नाट आयडिया, पेरणीसाठी ना ट्रॅक्टर ना बैलोजोडी, “तारफुली”द्वारे पेरणी

| Updated on: Jun 19, 2021 | 7:56 PM

यंदा विदर्भात 15 जूनपूर्वीच पावसाचं आगमन झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बैलजोडी व ट्रॅक्टरने पेरणी करतो.

अमरावतीच्या तरुण शेतकऱ्यांची भन्नाट आयडिया, पेरणीसाठी ना ट्रॅक्टर ना बैलोजोडी, तारफुलीद्वारे पेरणी
सतिश मुंद्र
Follow us on

अमरावती: यंदा विदर्भात 15 जूनपूर्वीच पावसाचं आगमन झालंय. विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. शेतकरी पेरणीसाठी बैलजोडी व ट्रॅक्टरने पेरणी करतो. मात्र, विदर्भातील काही शेतकरी तारफुलीच्या माध्यमातून शेतीची पेरणी करत आहेत. तारफुलीच्या माध्यमातून कमी मनुष्यबळ आणि कमी पैसा खर्च होतो. (Amaravati Youth Farmer Satish Mundre use Tarfuli system for germination)

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मालधूर येथील सतिश मुंद्रे या उच्च शिक्षित शेतकऱ्याने तारफुली पद्धतीचा वापर करत आपल्या शेताची पेरणी केलीय. मालधूर येथील युवा शेतकरी सतिश मुंद्रे यांनी इंजिनिअरिंगच शिक्षण घेतलंय. तरी सुद्धा ते आपल्या गावात शेती करत आहेत. सध्या सतिश यांच्या 3 एकर शेतीत कपाशी व तुरीची लागवड करण्यात आली आहे.

तारफुली पद्धतीतून आर्थिक बचत

साधारणत शेतकरी ट्रॅक्टर किंवा बैलजोडीच्या माध्यमातून पेरणी करतात. मात्र, ट्रॅक्टरची पेरणी खोलवर जाते, तसेच डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅकरचे पेरणी महागली आहे. बैलजोडीद्वारे पेरणी करण्याची पद्धत कालबाह्य होत आहे. वेळ, पैसा व मनुष्यबळ कमी लागत असल्यानं सतिश मुंद्रे यांनी तारफुलीच्या माध्यमातून पेरणी केली आहे.

तारफुली पद्धत नेमकी काय?

शेतात पेरणी करते वेळी तार घेऊन ठराविक अंतरावर काही खुणा केल्या जातात. शेतकरी त्या खुणांमध्ये बी टाकून ते मजवतो. विदर्भात सोयाबीन, तूर, कापूस हे प्रमुख पीक आहे. तारफुली पद्धतीद्वारे युवा शेतकरी आर्थिक बचत करत आहे.

75 ते 100 मिमी पावसाशिवाय पेरणी करु नका

गेल्या काही दिसांपासून सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले आहे. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये बऱ्यापैकी पाऊस देखील पडत आहे. यंदाचा उन्हाळा देखील एवढा जाणवला नाही आणि लगेच मॉन्सून देखील आला. निसर्गाच्या या खेळात शेतकऱ्यांचे मात्र अनेक वेळा हाल होतात तर कधी मदतही होते. . सध्या शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, राज्यभरात मान्सूनचे आगमन झाल्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांना एक महत्वाची सूचना केली आहे. . शेतकऱ्यांनी 75 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या:

नाशिक पुणे सेमीहायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध, वाकी बुद्रुकचे शेतकरी आक्रमक

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

(Amaravati Youth Farmer Satish Mundre use Tarfuli system for germination)