नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत.

नारळ शेतीतून शेतकऱ्यानं साधली प्रगती, पारंपारिक शेतीला पर्याय, अनेकांच्या रोजगाराची सोय
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 3:47 PM

बंगळुरु: कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील सिदप्पा यांनी नारळ शेतीतून वेगळी ओळख निर्माण केली आहे. नारळ शेतीसोबत त्यांनी केवळ पैसे कमावले नाहीत तर ते इतरांसाठी आदर्श ठरले आहेत. मात्र, सिदप्पा यांनी शेती सुरु केली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती. सामान्य शेतकऱ्यांसारखे ती पारंपारिक शेती करायचे, त्यावेळी शेतीतून मिळणारं उत्पन्न देखील अगदीच सामान्य होतं. (Karnataka farmers earning from coconut farming and gave job opportunity for others)

डीडी किसानच्या रिपोर्टनुसार सिदप्पा त्यांच्या शेतामध्ये बाजरी, धान यासारखी पिकं घेत होते. या पिकांना पाण्याची जास्त गरज होती. मात्र, सिदप्पा यांच्याकडे थोड्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्यानं सिंचनासाठी अधिक खर्च येत असे. सिदप्पा यांनी त्यामुळे काहीतरी वेगळ करण्याचं ठरवलं. कृषी विज्ञान केंद्राच्या वैज्ञानिकाशी त्यांनी संपर्क सादला. त्यांच्या सल्ल्यानुसर पाणी उपलब्धतेवर आधारित पिकाची शेती करण्याचं ठरवलं. जमिनीचा पोत आणि मातीची गुणवत्ता लक्षात घेऊन त्यांनी नारळाची झाडं लावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला थोड्या क्षेत्रात याची लागवड करण्यातल आली होती.

वर्षभर नारळाचं उत्पादन

नारळ शेतीतून फायदा होत असल्याचं लक्षात आल्यानंतर सिदप्पा यांनी त्यांची संख्या वाढवली. हे करत असताना सिदप्पा यांनी वेगवेगळ्या प्रकारची नारळाची झाडं लावली. सिदप्पा आता शेजारच्या जिल्ह्यांमध्ये आणि शहरांमध्ये नारळ पाठवतात आणि त्याची चांगली कमाई करतात. सिदप्पा सांगतात की पारंपारिक शेतीतून केवळ घराचा खर्च चालतो. नारळ विक्रीपासून येणाऱ्या पैशांची ते बचत करतात. मोठी रक्कम जमा झाल्यानंतर नारळाच्या शेतीचं क्षेत्र वाढवण्यासाठी ते जमीन खरेदी करतात.

अनेकांना रोजगार उपलब्ध

सिदप्पा सांगतात सुरुवातीच्या दिवसांमध्ये थोडी अडचण निर्माण झाली होती. मात्र, काम सुरु केल्यानंतर मागं वळून पाहण्याची गरज लागली नाही. शेतात कष्ट करण्याची तयारी आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कर्नाटकातील वेगवेगळ्या भागातून शेतकरी सिदप्पा यांच्या नारळ शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी येतात.

सिदप्पा यांच्या जवळपासचे लोक रोजगाराच्या शोधात दुसरीकडे जात होते. मात्र, सिदप्पा यांनी नारळ शेतीतून अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. सिदप्पा यांच्या शेतात अनेक प्रकारची काम वर्षभर सुरु असतात त्यामुळे अनेक मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

संबंधित बातम्या:

जळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना

Maharashtra Rain: पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

Karnataka farmers earning from coconut farming and gave job opportunity for others

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.