Maharashtra Rain: पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट

मान्सून महाराष्ट्रात चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Maharashtra Rain: पुढच्या 4 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणाला दोन दिवसांचा रेड ॲलर्ट
weather-alert
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 11:47 PM

पुणे: मान्सून महाराष्ट्रात चांगलाच सक्रिय झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने पुढील चार दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 20 आणि 21 तारखेला कोकणाला रेड ॲलर्ट  अतिवृष्टीचा दिला इशारा आहे. मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर 19 आणि 20 तारखेला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. (IMD Pune issue heavy rainfall alert for next four days for Kokan and Madhya Maharashtra and red alert for Kokan on 20 and 21 June )

मध्य महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर 19 आणि 20 तारखेला मुसळधार पावसाचा इशारा पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिला आहे. उद्या कोकणात रायगड, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

20 आणि 21 जूनला रेड अ‌ॅलर्ट

हवामान विभागानं पुढील चार दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तर, 20 आणि 21 जूनला कोकणाला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यानं पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे हवामान वेधशाळेचे अनुपम कश्यपी यांनी ही माहिती दिली आहे.

मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार

अनुपम कश्यपी यांनी 20 तारखेनंतर मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी होणार असल्याचं सांगितलं.

मुरबाडमध्ये मुसळधार पाऊस

आज दुपारी मुरबाड मध्ये मुसळधार पाऊस पडल्याने बाजरपेठेत पाणी साचले होते. आज दुपारी मुरबाड मध्ये झालेल्या मुसळधार पावसाने मुरबाड बाजरपेठे मध्ये पावसाचे पाणी तुंबल्याने गुढघाभर पाणी रस्त्यावर साचल्याने मुंबई सारखी मुरबडची परिस्थिती झाली. या पावसाच्या पाण्याने मुरबाड बाजारपेठेतील दुकानदार व नागग्रीकांची तारांबळ उडाली.

कोल्हापूरमध्ये पंचगंगेची पाणी पातळी वाढली

गेल्या तीन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर गेली असून तिची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नदीचे पाणी आता आजूबाजूच्या शेतात पसरायला सुरुवात झालीय. वाढलेल्या पाणीपातळी पंचगंगेचं मनात धडकी भरवणार रूप पुन्हा एकदा पाहायला मिळतय.

संबंधित बातम्या:

Maharashtra Rain: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुढील 4 तास महत्त्वाचे , मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा

(IMD Pune issue heavy rainfall alert for next four days for Kokan and Madhya Maharashtra and red alert for Kokan on 20 and 21 June)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.