Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे.

Weather ALert:पुणे साताऱ्यासह रत्नागिरीला रेड ॲलर्ट, पुढील 3 दिवसात कोकण, दक्षिण महाराष्ट्रासह विदर्भ मराठवाड्यात पावसाचा इशारा
पुणे, सातारा, रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट


मुंबई: भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे, सातारा आणि रत्नागिरीला हवामान विभागानं आजच्या दिवशी रेड अ‌ॅलर्ट दिला आहे. दुसरीकडे ऊद्या म्हणजे 18 जूनला पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील 4 तासात मुंबई, नवी मुंबई, सातारा आणि पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Weather Alert IMD issue red alert for Pune Satara and Ratnagiri next thee days rain alert for all regions of Maharashtra)

17 जूनला पुणे सातारा रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

18 जूनला दक्षिण कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला ऑरेंज अ‌ॅलर्ट

पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवसांमध्ये मुंबई आणि ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

19 आणि 20 जूनला महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात रेड किंवा ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा आणि पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सिंधुदुर्गातील तीन धरणे तुडुंब, नऊ धरणे 50 टक्के भरली

सिंधुदुर्गात गेले चार दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणांच्या साठ्यात वाढ झाली असून जिल्ह्यातील तीन धरणे तुडुंब भरली आहेत. तर नऊ धरणांमध्ये पन्नास टक्क्याहून अधिक पाण्याचा संचय झाला आहे. गेल्या चार दिवसात जिल्ह्यात सरासरी 432 मिमी पाऊस पडला. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, दुथडी भरून वाहत असताना तीन लघु पाटबंधारे प्रकल्पात 100 टक्के पाण्याचा संचय झाला आहे. यात सावंतवाडी तालुक्यातील माडखोल ,मालवण मधील धामापूर व कणकवली तालुक्यातील हरकूळ या लघु पाटबंधारे प्रकल्पांचा समावेश आहे. तर नऊ लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये 50 टक्क्याहुन जास्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन तीन दिवस पावसाचा जोर असाच राहिला तर सर्वच धरणे भरुन जातील, अशी शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Kolhapur Rain | कोल्हापुरात संततधार, नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, पंचगंगेची पाणी पातळी 23 फुटांवर

Maharashtra News LIVE Update | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, तेरेखोल नदीला पूर

(Weather Alert IMD issue red alert for Pune Satara and Ratnagiri next thee days rain alert for all regions of Maharashtra)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI