AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना

जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. (Jalgaon banana Famers sent 20 metric tones of bananas to Dubai international market)

जळगावातील केळी उत्पादकांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे कूच, 20 मेट्रिक टन केळीचा कंटेनर दुबईला रवाना
Jalgaon banana
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 9:52 AM
Share

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तांदलवाडी येथून 20 मेट्रिक टन केळीचा एक कंटेनर नुकताच दुबईला रवाना झाला आहे. यानिमित्ताने जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे आपली पावलं टाकायला सुरुवात केली आहे. (Jalgaon banana Famers sent 20 metric tones of bananas to Dubai international market)

कोट्यवधी रुपयांची उलाढाल

जळगावातील रावेर तालुक्यातील तांदलवाडी हे सुमारे 5 हजार लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील बहुसंख्य शेतकरी केळीचे उत्पादन घेतात. केळी उत्पादक शेतकरी वर्षाकाठी 350 कंटेनर म्हणजेच सुमारे 7 ते साडेसात हजार मेट्रिक टन निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतात. उत्पादित होणाऱ्या केळीपैकी काही माल हा देशांतर्गत स्थानिक बाजारपेठेत तर काही माल हा परदेशात निर्यात होतो. या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते.

Jalgaon banana

Jalgaon banana

जीआय मानांकन टॅगखाली पहिल्यांदा केळीची निर्यात

याच गावातील प्रगतशील शेतकरी प्रशांत महाजन यांनी पहिल्यांदा जीआय मानांकित केळीची परदेशात निर्यात केली आहे. आतापर्यंत या गावातील केळीची परदेशात निर्यात होत होती. मात्र, जीआय मानांकन या टॅगखाली पहिल्यांदा केळीची निर्यात झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्साह वाढला आहे.

Jalgaon banana

Jalgaon banana

म्हणून थेट दुबईला निर्यात शक्य

ॲग्रिकल्चर अँड प्रोसेसस्ड फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ॲथॉरिटी म्हणजेच ‘अपेडा’ने पुढाकार घेतल्याने आम्हाला जीआय मानांकित केळी दुबईला पाठवता आली. अपेडाने मध्यस्थी करत गुजरातमधील नवसारी येथील देसाई ॲग्री फूड्स नावाच्या कंपनीशी आमचा संवाद साधून दिला. त्यातून 20 मेट्रिक टन जीआय मानांकित केळी ट्रकने मुंबईला नेण्यात आली. तेथून जेएनपीटी बंदरावरून थेट दुबईला निर्यात करता आली, असे प्रशांत महाजन यांनी सांगितले. (Jalgaon banana Famers sent 20 metric tones of bananas to Dubai international market)

संबंधित बातम्या : 

मखाना शेतीतून ‘या’ राज्यातील शेतकऱ्यांना 3 ते 4 लाखांची कमाई, जाणून घ्या मखाना शेती नेमकी कशी करतात?

बार्शीच्या शेतकऱ्याची दुष्काळावर मात, खजूर शेतीतून लाखोंची कमाई, राजेंद्र देशमुख यांची प्रेरणादायी यशोगाथा नक्की वाचा

भारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांदा, पण तूर्तास कांदा दरावर परिणाम नाही!

ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....