भारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांदा, पण तूर्तास कांदा दरावर परिणाम नाही!

भारतीय कांद्याला टक्कर देण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांदा, पण तूर्तास कांदा दरावर परिणाम नाही!
संग्रहित छायाचित्र.

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. मात्र देशांतर्गत कांद्याची मागणी असल्याने कांद्याच्या बाजार भावावर कोणताही परिणाम तूर्त तरी होणार नाही. (Pakistani onions have no effect on Indian onion market prices)

उमेश पारीक

| Edited By: Akshay Adhav

Jun 17, 2021 | 11:27 AM

नाशिक : भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. मात्र देशांतर्गत कांद्याची मागणी असल्याने कांद्याच्या बाजार भावावर कोणताही परिणाम तूर्त तरी होणार नाही. (Pakistani onions have no effect on Indian onion market prices)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पाकिस्तानी कांदा

देशासह विदेशात कोरोनामुळे कांद्याची मागणी घटल्याने निर्यातीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. दरवर्षी साधारणता 35 ते 37 हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात परदेशात होते. यंदा मात्र फक्त 12 हजार कंटेनरद्वारे कांद्याची निर्यात परदेशात झाली आहे. हळूहळू आता देशासह विदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने अनलॉक होत आहे. त्यामुळे कांद्याची मागणी वाढत असल्याने कांद्याचे बाजार भाव दोन हजार रुपयांच्या वर गेले आहे.

यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण असताना आता पाकिस्तानचा कांदा बाजार भावाचे वांदे करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगल्या प्रतवारीत आणि भारतीय कांद्यापेक्षा कमी दरामध्ये उपलब्ध झाला आहे.

कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विका

श्रीलंकेत भारतीय कांदा 450 डॉलरमध्ये प्रति टन तर पाकिस्तानचा कांदा 310 डॉलर प्रति टनामध्ये मिळत आहे. मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजार भाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा बाजार समित्यांमध्ये कांद्याची मोठी आवक झाली.

तर कांद्याचे बाजार भाव कोसळतील पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहे.

(Pakistani onions have no effect on Indian onion market prices)

हे ही वाचा :

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें