मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अन्न धान्य निर्यातीमध्ये भारताला पाकिस्तान टक्कर दिली आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारात कमी भावानं मका निर्यात करत आहे.

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु
मका
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jun 16, 2021 | 11:50 PM

नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अन्न धान्य निर्यातीमध्ये भारताला पाकिस्तान टक्कर दिली आहे. भारताच्या तुलनेत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारात कमी भावानं मका निर्यात करत आहे. पाकिस्तान भारतापेक्षा 1675 कमी रुपयांनी मका विक्री करत आहेत. दक्षिण पूर्व आशियामध्ये पाकिस्तान कमी किमतीत मका विक्री करत आहे. माध्यमात आलेल्या रिपोर्टनुसार पाकिस्तान 20 हजार 675 रुपयांना एक टन मका विक्री करत आहे. पाकिस्तानी व्यापाऱ्यांकडून निर्यात वाढवण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. पाकिस्तानला 10 लाख टन मका निर्यात करायची आहे. (Pakistan offers corn cheaper than India in South East Asia know the reason behind the same)

मका किमतीमध्ये तेजी

भारत जगभरात मोठ्या प्रमाणात अन्न धान्य निर्यात करत आहे अशावेळी पाकिस्ताननं मका निर्यात सुरु केली आहे. भारतानं सध्या मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका आणि बांग्लादेशला 4 लाख टन मका निर्यातीचा करार केला आहे. चीन, अमेरिका, ब्राझील मधील वाढत्या मागणीमुळे मका किमतीमध्ये 35 टक्के तेजी पाहायला मिळाली आहे.

भारत सध्या आग्नेय आशियाई देशांमध्ये 305 डॉलर म्हणजेच 22,350 रुपये दराने मका विकत आहे. मात्र, यावेळी अनेक कारणांमुळे मागणी घटली आहे. या देशांमधील विक्रीवर कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणामही होत आहे. पाकिस्तानने स्वस्तात मका पुरविल्यामुळे भारताच्या निर्यातीवरही परिणाम झाला आहे. देशांतर्गत बाजारात मका अजूनही प्रति क्विंटल 1870 रुपयांच्या किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) खरेदी केला जात आहे.

मका निर्यातीत वाढ

भारत आणि पाकिस्तानच्या तुलनेत ब्राझीलला प्रति टन 295 डॉलरला म्हणजेच 21,625 रुपये आणि अमेरिकेला प्रति टन 306 डॉलर म्हणजेच 22,425 रुपये दराने मका देत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत दोन्ही देशांच्या किंमती अनुक्रमे क्रमश: 63 आणि 90 टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षी बांगलादेश, नेपाळ आणि आग्नेय आशियात भारताने सुमारे 25 लाख टन मक्याची निर्यात केली. गेल्या 6 वर्षातील ही सर्वात मोठी वाढ होती.

पोल्ट्री क्षेत्रासाठी मक्याची निर्यात मोठ्या प्रमाणात भारतातून केली जाते. परंतु कोविड -19 साथीच्या रोगामुळे पोल्ट्री क्षेत्रावरही वाईट परिणाम झाला आहे. गेल्या काही वर्षांत पाकिस्तान मक्याचा प्रमुख उत्पादक म्हणून उदयास आला आहे.

संबंधित बातम्या:

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?

जळगावच्या केळीचा जगभरात डंका, भारत केळी उत्पादनात अग्रेसर, वर्षभरात 619 कोटींची निर्यात

Pakistan offers corn cheaper than India in South East Asia know the reason behind the same

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें