IND vs SA 3rd Odi : तिसरा-अंतिम सामना, टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, दक्षिण आफ्रिका रोखणार?
India vs South Africa 3rd Odi Live Streaming : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला कसोटी मालिकेत 0-2 ने व्हाईटवॉश केलं. त्यामुळे टीम इंडियासमोर एकदिवसीय मालिकेत विजयी होण्याचं आव्हान आहे. उभयसंघातील ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. भारताने रांचीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताचा दुसऱ्या सामन्यात धुव्वा उडवला. त्यामुळे मालिकेत बरोबरी झाली. आता तिसरा आणि अंतिम सामना जिंकून मालिकेवर आपलं नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध भिडताना दिसणार आहेत. केएल राहुल टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर टेम्बा बवुमा याच्या खांद्यावर दक्षिण आफ्रिकेची जबाबदारी आहे. हा तिसरा आणि अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कधी?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना शनिवारी 6 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना कुठे?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता नाणेफेकीचा कौल लागणार आहे. टीम इंडियाच्या बाजूने 21 व्या प्रयत्नात तरी एकदिवसीय क्रिकेटमध्ये नाणेफेकीचा कौल लागणार का? याकडे चाहत्यांची करडी नजर असणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल. तसेच टीव्ही 9 मराठीच्या https://www.tv9marathi.com/sports/cricket या लिंकवर सामन्यातील प्रत्येक अपडेट जाणून घेता येईल.
केएल टीम इंडियाला सलग दुसरी मालिका जिंकवणार?
दरम्यान केएल राहुल याने त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2023 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजयी केलं होतं. त्यामुळे आता केएल भारताला पुन्हा एकदा मालिका जिंकून देणार की नाही? हे तिसऱ्या सामन्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
