AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आर्थिक संकट येण्यापूर्वी मिळतात हे 4 संकेत, चाणक्य यांनी काय म्हटलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, ते म्हणतात जेव्हा तुमच्यावर आर्थिक संकट येणार असंत तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव करून देणारे काही विशिष्ट संकेत मिळतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : आर्थिक संकट येण्यापूर्वी मिळतात हे 4 संकेत, चाणक्य यांनी काय म्हटलंय?
CHANKYA Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 15, 2026 | 11:23 AM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत,  ज्या आजच्या काळातही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तुमच्यावर जेव्हा आर्थिक संकट येतं, तेव्हा त्यासाठी अनेक घटक कारणीभूत असू शकतात. मात्र जेव्हा तुमच्यावर एखादं आर्थिक संकट येणार असतं, तेव्हा त्याची जाणीव करून देण्यासाठी तुम्हाला चार संकेत मिळतात. तुम्ही जर या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं आणि त्याप्रमाणे बदल घडवून आणले तर तुम्ही या संकटातून वाचू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?

घरात सतत भांडणं – चाणक्य म्हणतात ज्या घरात सतत भांडणं होतात, पती-पत्नीमध्ये पटत नाही. अशा घरात कधीही पैसा टिकत नाही. ज्या घरात सतत भांडणं होतात, त्या घरावर लक्ष्मी माता नाराज होते. अशा घरात कधीच बरकत राहत नाही. त्यामुळे घरावर मोठं आर्थिक संकट ओढावतं असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे घर नेहमी शांत असावं. पती-पत्नीने समजूतदारपणाने वागावे, घरात कलह नसावा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

महिला, वृद्धाचा अनादर – चाणक्य म्हणतात ज्या घरात महिला आणि वृद्धांचा अनादर होतो, त्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही. लक्ष्मी माता नाराज होते. एक गोष्ट लक्षात ठेवा, वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आयुष्यात खूप सगळे अनुभव घेतलेले असतात, त्यामुळे त्यांचा आदर करा,  त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घ्या असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

पुजा न करणे – चाणक्य म्हणतात ज्या घरातील वातावरण धार्मिक नसतं, ज्या घरात कधीही पूजा केली जात नाही. अशा घरावर देखील लक्ष्मी माता नाराज होते. अशा घरात पैसा टिकत नाही.

तुळस – चाणक्य म्हणतात ज्या घरात तुळस नसते, त्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही, त्यामुळे प्रत्येक घरात तुळस असलीच पाहिजे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
Uddhav Thackeray | विश्वासू खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त...
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
kalyan | कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव... मुख्यमंत्र्यांनी सूत्रसंचालकाला मध्येच अडवलं अन्...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
Uddhav Thackeray | 6 बंडखोर खासदारांविरोधात उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा
ओमराजे निर्णय घेण्याआधीच शिंदेंचे खासदार... शिंदेच्या कार्यकर्त्यांचा घराबाहेर गराडा; पुण्यातील राजकीय हालचालींना वेग
परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला
Parbhani| परभणीच्या हनुमान मंदिरात मोठी दुर्घटना, बांधकाम सुरु असताना छत कोसळला, अनेकजण जखमी
शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
Amit Shah | शिंदे गट नाही, आता एकच शिवसेना!; अमित शाहांच्या विधानाने चर्चांना उधाण
शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम...
Omraje Nimbalkar | शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? ओमराजेंचं मोठं विधान, 2 दिवसांत अंतिम निर्णय घेणार!
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी
शिंदेंच्या सेनेतील बडा नेता ओमराजेंच्या भेटीला; पुण्याच्या निवासस्थानी... राजकारणातील घडामोडींना वेग