रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीही उपस्थिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नात रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्याला व्हीलचेअरवरून उपस्थिती लावली. या विवाहसोहळ्याचे काही फोटो समोर आले असून सोशल मीडियावर त्यांची मोठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांचा विवाह आज पार पडत आहे.

लग्नस्थळी पाहुण्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रेवती आणि सारंग यांच्या लग्नासाठी विशेष सजावट करण्यात आली असून लग्नापूर्वीचे विविध कार्यक्रमही उत्साहात पार पडले. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
गेल्या काही काळापासून शरद पवार यांची तब्येत ठीक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते व्हीलचेअरवरून विवाहस्थळी दाखल झाले. तरीही त्यांनी नातीच्या लग्नाला उपस्थित राहत कुटुंबासोबत आनंद साजरा केला. या सोहळ्यासाठी अनेक राजकीय नेते, नातेवाईक आणि जवळचे मित्र उपस्थित होते. तसेच सुनेत्रा पवार यांनीही विवाहसोहळ्यात हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे.
Published on: Jun 20, 2026 06:46 PM
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...