AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad: रस्त्याकडेला पोतं, 2 मानवी पाय अन्.. पिंपरी चिंचवडमध्ये भयावह दृश्य; परिसरात खळबळ

पोते उघडताच मानवी पाय असल्याचं समोर आलं. गुडघ्यापासून हे पाय वेगळे करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले

Pimpri Chinchwad: रस्त्याकडेला पोतं, 2 मानवी पाय अन्.. पिंपरी चिंचवडमध्ये भयावह दृश्य; परिसरात खळबळ
| Updated on: Nov 06, 2026 | 4:23 PM
Share

 Pimpri Chinchwad Crime: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात रस्त्याच्या कडेला दोन मानवी पायाचे अवयव आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलेल्या पोत्यामध्ये पुरुषाचे दोन पाय आढळून आले असून या धक्कादायक प्रकाराने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या..

रस्त्याच्या कडेला पोत्यात पुरुषाचे पाय, पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्याच्या कडेला कचऱ्यात टाकलेल्या पोत्यामध्ये पुरुषाचे दोन पाय आढळल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास कृष्णा लोट आणि ओमकार काळे हे कचरा गोळा करण्यासाठी आले असता त्यांना पोत्यावर रक्ताचे डाग दिसले.

सुरुवातीला श्वानाचे पाय असल्याचा संशय आला, मात्र पोते उघडताच मानवी पाय असल्याचं समोर आलं. गुडघ्यापासून हे पाय वेगळे करण्यात आले आहेत. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, हे पाय कुणाचे आहेत आणि यामागे नेमकं काय गूढ आहे? याचा तपास सुरू आहे.

जळगावमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाकडून तिघांना मारहाण!

दुसरीकडे, जळगावमध्ये पाळीव कुत्रा भुंकल्यावरून माजी नगरसेवक पुत्राकडून तिघांना मारहाण मारहाण करण्यात आली असून एकावर थेट चाकूने वार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.  बुलेटचा आवाज ऐकून पाळीव कूत्रा भूकंत मागे पळाल्याचा राग आल्याने माजी नगरसेवक पुत्राकडून मारहाण ही मारहाण करण्यात आली.

यावेळी माजी नगरसेवक पुत्राने  एका उद्योजकांसह त्याचा मुलगा, पत्नी, कार ड्रायव्हर अशा चौघांनाही मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे उद्योजकावर चाकूने देखील वार केला.  दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक पुत्र दारा पिरजादेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?