6.99 लाख रुपयांच्या या इलेक्ट्रिक कारवर मिळतेय 1.45 लाख रुपयांपर्यंत सूट, 285 किमी रेंज अन् फीचर्स जबरदस्त
6.99 लाख रुपयांच्या या इलेक्ट्रिक कारवर मिळतोय तब्बल 1.45 लाख रुपयांपर्यंत डिस्काउंट. 285 किमी रेज आणि जबरदस्त फीचर्स. खरेदीसाठी दिवाळीमध्ये उडणार झुंबड.

टाटा मोटर्सकडून नोव्हेंबर 2026 मध्ये आपल्या इलेक्ट्रिक कारवर आकर्षक डिस्काउंट ऑफर्स दिल्या जात आहेत. यामध्ये कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक हॅचबॅक टाटा टियागो EV वर ग्राहकांना 1.45 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी मिळत आहे. या ऑफरमध्ये ग्रीन बोनस, इंटरव्हेन्शन ऑफर आणि स्क्रॅपेज बोनसचा समावेश आहे.
टियागो EV च्या LR XT व्हेरिएंटवर 70 हजार रुपये ग्रीन बोनस, 50 हजार रुपये इंटरव्हेन्शन ऑफर आणि 25 हजार रुपये स्क्रॅपेज बोनस मिळत आहे. त्यामुळे एकूण 1.45 लाख रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो.
तर लॉन्ग रेंज (LR) XZ+ व्हेरिएंटवर 1 लाख रुपयांचा ग्रीन बोनस मिळत असून, एकूण 1.25 लाख रुपयांपर्यंत बचत करता येईल. याशिवाय मीडियम रेंज (MR) च्या सर्व व्हेरिएंटवर 65 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट दिला जात आहे.
फीचर्स आणि सेफ्टी
टाटा टियागो EV मध्ये 8-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देण्यात आली आहे. ही सिस्टीम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेला सपोर्ट करते. याशिवाय क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग मोड यांसारखे फीचर्स मिळतात.
सुरक्षेसाठी कारमध्ये 6 एअरबॅग स्टँडर्ड देण्यात आले आहेत. तसेच ABS सह EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, रिअर कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि हिल होल्ड असिस्ट यांसारख्या सुविधा आहेत.
बॅटरी आणि ड्रायव्हिंग रेंज
टियागो EV मध्ये 19.2 kWh आणि 24 kWh असे दोन बॅटरी पॅक पर्याय मिळतात. 19.2 kWh बॅटरी पॅकवर एका चार्जमध्ये सुमारे 226 किलोमीटर, तर 24 kWh बॅटरी पॅकवर 285 किलोमीटरपर्यंत रेंज मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. फास्ट चार्जरच्या मदतीने कारची बॅटरी 10 ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी सुमारे 35 मिनिटे लागतात.
किंमत आणि BaaS पर्याय
टाटा टियागो EV ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 6. 99 लाख रुपये असून, टॉप व्हेरिएंटची किंमत 10.09 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीने यामध्ये बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (BaaS) पर्यायही उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायामुळे कारची सुरुवातीची किंमत 4.69 लाख रुपयांपर्यंत कमी होते. मात्र, यामध्ये बॅटरी वापरासाठी वेगळे शुल्क लागू होऊ शकते.
डिस्क्लेमर: वरील डिस्काउंटची माहिती विविध स्रोतांच्या आधारे देण्यात आली आहे. प्रत्यक्ष ऑफर आणि फायदे डीलरशिपनुसार वेगळे असू शकतात.
