AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवार अ‍ॅडमिट, राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, बड्या नेत्याने तटकरेंना फटकारलं?

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात असताना, सुनील तटकरे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी विलिनीकरण प्रस्तावाची खळबळजनक माहिती दिली. यावर अनिल देशमुख यांनी तटकरेंना चांगलेच फटकारले, त्यांच्या पूर्वीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशमुख म्हणाले की, त्यावेळी विलिनीकरण नाकारणारे तटकरे आता अचानक हे का बोलत आहेत? सध्याच्या परिस्थितीत दोन्ही गट एकत्र येणे शक्य नाही.

पवार अ‍ॅडमिट, राष्ट्रवादीत मोठ्या घडामोडी, बड्या नेत्याने तटकरेंना फटकारलं?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 3:44 PM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल रात्री राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यानंतर आज सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा बॉम्ब टाकला आहे. अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कल्पना दिली होती, असं सुनील तटकरे यांनी सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. तटकरेंचं हे विधान येताच त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी तर तटकरे यांना चांगलंच फटकारलं आहे. अजितदादांनी विलिनीकरणाची तारीख ठरवली होती. विलिनीकरण होणार होतं हे आम्ही तेव्हा सांगत असताना तुम्ही नाकारत का होता? आता कोणत्या हेतूने विलिनीकरणाबद्दल बोलत आहात? असा सवालच अनिल देशमुख यांनी केला आहे.

माजी मंत्री अनिल देशमुख यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलिनीकरणाच्या बैठका झाल्या होत्या. दोन्ही पक्ष एकत्र आले पाहिजे ही चर्चा झाली होती. या बैठका झाल्या होत्या, असं आम्ही तेव्हा सांगत होतो. पण तेव्हा अशी काही चर्चाच झाली नाही. अजितदादांनी वेगळ्या कारणांनी बैठका घेतल्या होत्या, असं सुनील तटकरे सांगत होते. अजितदादा मला कधीच विलिनीकरणाबाबत बोलले नाही, असंही तटकरे तेव्हा सांगत होते. आता तटकरेंना अचानक काय झालं? त्यावेळी तर तुम्ही चर्चाच नाकारत होता. तेव्हा तुम्ही कुणाचा अजेंडा राबवत होता हे माहीत नाही. कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही असं बोलत होता? आता का वेगळी भूमिका घेतली आहे? असे सवालच अनिल देशमुख यांनी केले आहेत.

आताच का वाटयला लागलं?

विलिनीकरणाबाबत तटकरेंना आजच का वाटू लागलं आहे? दोन्ही पक्षाची बैठक झाल्याचं तेव्हाच का सांगितलं नाही? आम्ही फोटोही दाखवलं होते. त्यांच्या पक्षात काही नवीन बदल होणार असतील, काही घडत असेल त्यामुळे ते बोलत असतील. 12 फेब्रुवारीला आम्ही एकत्र येणार होतो. तारीखही ठरली होती. तेव्हा तटकरेंनी विरोध केला होता. आज त्यांना अचानक काय झालं?, असा सवाल देशमुख यांनी केला.

आता शक्यच नाही

सध्याच्या परिस्थिती दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रश्नच नाही. आता एकत्र येणं सोपं नाहीये. जेव्हा एकत्र येण्याचं ठरलं होतं, तेव्हा दादांच्या निधनानंतर याच लोकांनी विरोध केला होता, असं सांगतानाच त्यांच्या पक्षात अंतर्गत काय सुरू आहे माहीत नाही. तो त्यांच्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?