AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: ‘डॉक्टरांनी मला सांगितलं..’, शरद पवारांच्या प्रकृतीबाबत एकनाथ शिंदे महत्त्वाचं बोलले!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. 

Eknath Shinde: 'डॉक्टरांनी मला सांगितलं..', शरद पवारांच्या प्रकृतीबाबत एकनाथ शिंदे महत्त्वाचं बोलले!
| Updated on: Nov 06, 2026 | 3:36 PM
Share

Eknath Shinde Meet Sharad Pawar:  देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांना पुण्यातील रुबी रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यानंतर ते मुंबईमध्ये ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. शरद पवार यांना रुग्णालयात दाखल केल्यापासून राज्यातील नेते त्यांची भेट घेत आहेत. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

“शरद पवार यांना मी रुग्णालयात भेटून आलो. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, सुप्रियाताईही उपस्थित होत्या. माझी डॉक्टरांशीही चर्चा झाली. पवारसाहेबांची तब्येत आता उत्तम आहे. त्यांना उद्या डिस्चार्जही होईल. चिंता करण्याची काहीही गरज नाही. डॉक्टरांनीही उद्या डिस्चार्ज होईल असं सांगितलं आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

तसेच “ही राजकीय भेट नव्हती. महाराष्ट्रातील एखादा ज्येष्ठ नेता रुग्णालयात असतो तेव्हा त्यांना भेटण्यामागे राजकीय हेतू नसतो. राजकारणापलिकडेही काही नाती असतात, पवार साहेबांचे आणि माझे संबंध राजकारणापुरते मर्यादित नाहीत. पवार साहेबांशी चर्चा झाली. ते कधीही काही प्रश्न असतील तर मला फोन करतात, आमचे कौटुंबिक संबंध आहेत,” असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

“शरद पवार यांनी यावेळी दुष्काळावरही चर्चा केली. दुष्काळाच्या बाबतीत अतिशय संवेदनशील ते दिसले. त्यांनी मला साताऱ्यातील दुष्काळाच्या परिस्थितीबाबतही माझ्याकडे चौकशी केली. पाण्याची काय परिस्थिती आहे याबाबतही त्यांनी मला विचारले. दुष्काळ दौरा करत असतानाच त्यांना इन्फेक्शन झाले. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, याआधीही अनेक नेते शरद पवार यांच्या भेटीला आले होते. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल तसेच छगन भुजबळ यांनीही शरद पवार यांची रुग्णालयात भेट घेतली होती. या भेटीनंतर राष्ट्रवादी विलिनिकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत.

Follow Us
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?