AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!

Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!

| Updated on: Nov 06, 2026 | 11:23 AM
Share

राज ठाकरेंनी गोकुळमधील पाच नामनिर्देशित संचालकांच्या नियुक्तीवरून भाजपला थेट सवाल केला आहे. लोकशाही वाचवण्याची भाषा करणाऱ्या भाजपने अशा नियुक्त्या का केल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपने रडीचा डाव खेळणे थांबवून पराभव स्वीकारायला शिकावे, असा सल्लाही राज ठाकरेंनी दिला आहे. या निर्णयावर सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोकुळ दूध संघात पाच नामनिर्देशित संचालक नेमून त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या भाजप सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. लोकशाही वाचवा असे म्हणता, मग गोकुळमध्ये तुमचे पाच संचालक का नेमले? असा थेट सवाल राज ठाकरेंनी भाजपला विचारला आहे.

त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भाजपवर हल्लाबोल करत म्हटले आहे की, भाजपने रडीचा डाव खेळणे बंद करावे. गेली १२ वर्षे विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपचा विजय सहन केला, आता जनता भाजपपासून दुरावत असताना भाजपने पराभव स्वीकारायला शिकले पाहिजे. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता, ज्यावर विविध राजकीय पक्षांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. सत्ताधारी महायुतीतील शिंदे गटाच्या शिवसेनेनेही या निर्णयाबाबत नाराजी दर्शवल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे गोकुळमधील राजकारण तापले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Nov 06, 2026 11:23 AM

Follow Us