AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील तटकरेंचं सुनेत्रा पवारांवर दबावतंत्र? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा काय?

राष्ट्रवादी काँग्रेसमधील विलिनीकरणावर सुनील तटकरेंनी केलेल्या विधानामुळे सुनेत्रा पवारांवर दबावतंत्राचा वापर होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अजित पवार गटाचे नेते अनिल पाटील यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. पाटील यांच्या मते, पक्षात सर्व निर्णय एकमताने होतात आणि सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखालीच महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात, त्यामुळे कोणताही दबाव नाही.

सुनील तटकरेंचं सुनेत्रा पवारांवर दबावतंत्र? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा काय?
sunil tatkareImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 06, 2026 | 3:03 PM
Share

अजित पवार असते तर दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं. विलिनीकरणाची चर्चा झाली होती, याची कल्पना मला अजितदादांनी दिली होती, असं विधान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी करून मोठा बॉम्ब फोडला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला हवा मिळाली आहे. तसेच असं विधान करून तटकरे एक प्रकारे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर दबाव तंत्राची सुरुवात केल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील यांनी थेट आणि रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अजितदादा गटाचे नेते अनिल पाटील यांनी सुनील तटकरे यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रेशर टॅक्टिस वाटत नाही. चार दिवस झाले आमच्या कोअर कमिटीच्या बैठका होत आहेत. एनडीएच्या नेत्यांसोबत आमचे नेते चर्चा करत आहेत. महाराष्ट्रातील समस्या आणि इतर विषयावर चर्चा करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे अशा भेटीगाठींमुळे सुनीता वहिनींवर प्रेशर येईल असं वाटत नाही. आमच्या पक्षात एकमताने निर्णय होतात. अजितदादा असते तर काय झालं असतं नसतं हा विषय आता राहिला नाही. त्यांनी काही निर्णय घेतला असता तर त्यांच्यासोबत आम्ही राहिलो असतो. आता जो काही निर्णय व्हायचा तो सुनीता विहिनींच्या नेतृत्वात होईल. प्रेशर वगैरे आहेत ते वाटत नाही. सुनीता वहिनींशी चर्चा करूनच आमच्या नेत्यांनी एनडीएच्या नेत्यांशी केली, असं अनिल पाटील यांनी सांगितलं.

आम्हाला काही माहीत नाही

अजितदादा गेले त्यावेळी आमच्यातील काही लोकांनी विलिनीकरणाबाबतचं विधान केलं होतं. अजितदादा गेल्यानंतर गटनेता निवडतानाही विलिनीकरणा विषयी विचारण्यात आलं होतं. तेव्हा प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळांनी अशी चर्चा झाली नसल्याचं म्हटलं होतं. अजितदादांशी शरद पवार गटाची चर्चा झाली असेल. पण आमच्यासोबत काही चर्चा झाली नाही. आम्हाला त्याची काही माहिती नाही, असं या नेत्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं, असं अनिल पाटील यांनी म्हटलंय.

या क्षणी कोणतीही चर्चा नाही

परवा आमच्या पक्षाची बैठक झाली. तेव्हाही तटकरेंनी विलिनीकरणाबाबत काहीच भाष्य केलं नाही. आता त्यांनी हे विधान केलं असेल तर त्यांनी कशासाठी केलं ते त्यांनाच माहीत. त्यांना विचारलं पाहिजे. दादांनी विलिनीकरणाची चर्चा केली नाही, असं तटकरे नेहमी सांगत होते. आमच्यासोबत ज्या ज्या बैठका झाल्या त्यावेळी ते हेच सांगत होते, असंही त्यांनी सांगितलं. पण याक्षणी आमच्या स्तरापर्यंत विलिनीकरणाची काहीच नाही. वरिष्ठ स्तरावरचं झाली की नाही माहीत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

निर्णय एकमतानेच

पक्षातील नियुक्त्यांच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. दादा गेल्यापासूनच्या नियुक्त्या रिक्त होत्या. त्या भरल्या गेल्या. 8 महिन्यात या नियुक्त्यांबाबत काहीच निर्णय झाला नव्हता. नियुक्त्या झाल्यावर का झाल्या अशी चर्चा होत आहे. संघटनेच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वाच्या असतात. नियुक्त्यांवर प्रदेशाध्यक्षांची सही असते, मतभेद असू शकतात पण निर्णय एकमताने होतो, असं ते म्हणाले.

Follow Us
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल...
मोठी बातमी! मृत्यूपूर्वी वैभव चव्हाण यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; क्रीडा घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याचा दावा
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा...
महाराष्ट्र राज्याला मिळणार राष्ट्रीय पुरस्कार! नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील कामगिरीचा गौरव
गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
Raj Thackeray : गोकुळमध्ये भाजपचे 5 संचालक नेमलेच कसे? राज ठाकरेंचा थेट सवाल!
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन..
गोकुळ दुध संघातील तिढा कधी सुटणार? चंद्रकांत पाटलांच्या भेटीनंतर हसन मुश्रीफ स्पष्टच म्हणाले...
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज..
बीडीडी चाळीतील रहिवाशांचं घराचं स्वप्न पूर्ण होणार! 557 सदनिकांचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी...
मुख्यमंत्र्यांची दिवाळी शेतकऱ्यांसोबत! देवेंद्र फडणवीस गावात साजरी करणार सण
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत
MPSC गैरप्रकारांच्या तक्रारींसाठी 16 नोव्हेंबरपर्यंत मुदत, प्रतिज्ञापत्रांबाबत नेमकं काय म्हणाले तुकाराम मुंढे?
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद,
ईडीच्या रडारवरून हसन मुश्रीफ बाहेर! 2022 मधील ते प्रकरण अखेर बंद, नेमकं काय घडलं होतं?
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट..
अखेर TCS धर्मांतर प्रकरणी मोठी अपडेट समोर! एसआयटीच्या तपासानंतर थेट कारवाई