Karmabhoomi Express : ऐन दिवाळीत धावत्या एक्स्प्रेसला लागली भीषण आग; धडकी भरवणारे फोटो समोर
ऐन दिवाळीत धावत्या एक्स्प्रेसच्या 4 डब्यांना आग लागली आहे. या एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे धडकी भरवणारे फोटो समोर आले आहेत.

karmabhumi express trainImage Credit source: टीव्ही9 मराठी
- ऐन दिवाळीत पंजाबच्या राजपुरामध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. अमृतसर येथून न्यू जलपाईगुडीला जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसच्या 4 डब्यांना आग लागली आहे.
- कर्मभूमी एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक्स्प्रेसला लागलेल्या आगीचे लोट आकाशात पसरले आहेत.
- आग लागल्याचे माहिती मिळताच एक्स्प्रेस रोखण्यात यश मिळालं. या घटनेत कोणी जखमी झालं आहे का, याविषयी कोणतीची माहिती मिळालेली नाही.
- ज्यावेळी आग लागली होती, त्यावेळी एक्स्प्रेस रुळावर धावत होती. आग लागल्यानंतर प्रवाशांनी चेन खेचून ट्रेन थांबवली.
- ट्रेनला आग लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या आगीत एक्स्प्रेसचं प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे.
Follow Us





