AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satej Patil: ‘गोकुळ’च्या 4 शासननियुक्त संचालकांविषयी सतेज पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट, केवळ तीन महिनेच…

Satej Patil Big Statements: गोकुळचे महाभारत अवघ्या राज्याने पाहिले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांची निवड झाली. त्यानंतर आता काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

Satej Patil: 'गोकुळ'च्या 4 शासननियुक्त संचालकांविषयी सतेज पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट, केवळ तीन महिनेच...
4 सदस्य तीन महिन्यात राजीनामा देतील, सतेज पाटलांचा गौप्यस्फोट
| Updated on: Nov 11, 2026 | 7:05 AM
Share

Satej Patil Big Statements: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळमध्ये अखेर महायुतीचा अध्यक्ष कारभार हाकणार आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील यांची निवड झाली. ही निवडणूक १६ विरुद्ध १३ अशा फरकारने पार पडली. महायुतीने राजेश पाटील तर सतेज पाटील यांच्या आघाडीने शशिकांत पाटील-चुयेकर यांना उमेदवारी दिली होती. राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ४ शासननिुयक्त संचालकांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे महायुतीचा अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाला. त्याचवेळी सतेज पाटील यांनी या शासननियुक्त संचालकांविषयी एक मोठा गौफ्यस्फोट केला आहे.

आम्हाला गाफिल ठेवण्याचा प्रयत्न केला

आमच्याकडे बहुमत असताना 4 संचालक नेमले आणि मतांचा अधिकार दिला. मुख्यमंत्री पॉझिटीव्ह बोलणे आणि दुसरीकडे महाडिकांनी वेगळी भूमिका मांडली. आम्हाला गाफिल ठेवण्याचा प्रयत्न होता. इलेक्शन प्रेसेसला कोरम लागत नाही. मात्र तरीही सरकारने ते केले. कोरमसाठी आम्ही केले असे आता ते सांगत आहेत. गोकुळच्या सत्तेसाठी, ताब्यात घेण्यासाठी ओर्डिनन्स काढला. कोर्टातून आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. कालचा मोर्चा महायुतीच्या नेत्यांच्या जिव्हारी लागला. लोकशाही टीकावी म्हणून राज्यभरातून लोकं आले. एका संचालकाच्या चॅनेलमधून मला ट्रोल केले जात आहे. काही हरकत नाही मला कितीही ट्रोल करू दे. न्यायालयाने मतदानाचा निर्णय दिल्याने आम्ही निवडणूक प्रक्रियेला गेलो नाही. सभा झाली त्यानंतर त्यातील नेत्यांचे चेहरे किती तेज होते हे सभेतून दिसून येईल, असे सतेज पाटील म्हणाले.

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर टीका

त्यांना कळले की आपण चुकलोय. चंद्रकांत दादा जेवढे मोठे होतायत तेवढी त्यांची वैचारिकता कमी होतेय. डी. वाय. पाटील यांच्यावर बोलून काय मिळवले. त्यांच्यावर पण आरोप केले. चंद्रकांत दादांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला आणि आता त्यांना वादात ओढताय. मी पण पाटील आहे. सरकारी यंत्रणेतून मला धमकी देऊ नका. सरकार यंत्रणेचा वापर करुन मला ब्लॅकमेल करत आहेत. पण मी पाटील आहे हे खपवून घेणार नाही. मुश्रीफ साहेब पण टीका केली. मी त्यांना पहिली मदत केली होती. आपण एकमेकांना मदत करत असतो. 2022 ला काँग्रेसने भाजपचे धुळ्यातून अंबरीश पटेल, मुंबईतील निवडणूक बिनविरोध केली म्हणून माझी निवडणूक बिनविरोध झाली. कोर्टातून उलटा निकाल आला तर 13 लोकांनी घरी जायचे. कारण आम्ही त्यानंतर संघावर प्रशासक आणू आणि तुम्हाला घरी घालवू. म्हणजे शासनाचा गैरवापर कसा करतात हे लोकांसमोर आले आहे. आता राज्यात ऑर्डीनन्स काढून निकाल लागतील, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

4 सदस्य तीन महिन्यात राजीनामा देतील, सतेज पाटलांचा गौप्यस्फोट

गोकुळमध्ये इथून पुढे जे चांगले चालले असेल तर त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. पण चुकीचे चालले असेल तर आम्ही त्याला विरोध करू. काही स्वीकृत संचालकाचे 6 महिन्याचे अनुभव प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचे पाहायला मिळतेय. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पडलेल्या लोकांना मी संचालक करणार नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या शासननियुक्त संचालक केवळ 3 महिन्यासाठी नेमलेत नंतर पडलेल्या लोकांना संचालक करणार अशी माहिती आहे, असा गौप्यस्फोट आमदार सतेज पाटील यांनी केला.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?