AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला तर वाटतं तो घातपात… अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी उमेश पाटील यांचा दिवाळीत बॉम्ब, रोख कुणावर? विलिनीकरणावर मोठे भाष्य

Umesh Patil on Ajit Pawar: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अजून नाना तर्कवितर्क आहेत. आमदार रोहित पवार यांनी तर हा घातपात असल्याचा दावा केला आहे. आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सुद्धा मोठा बॉम्ब टाकला आहे.

मला तर वाटतं तो घातपात... अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी उमेश पाटील यांचा दिवाळीत बॉम्ब, रोख कुणावर? विलिनीकरणावर मोठे भाष्य
मला तर वाटतं तो घातपात... उमेश पाटील यांचा दिवाळीत बॉम्ब
| Updated on: Nov 11, 2026 | 6:29 AM
Share

Umesh Patil on Ajit Pawar: अजितदादा पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी विमान अपघातात बारामतीजवळ निधन झाले. या विमान अपघाताविषयी साशंकता अधिक आहे. हा घातपात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी चार पत्रकार परिषद घेऊन केला आहे. त्यांनी याविषयीचे अनेक मुद्दे आणि कांगोरेही समोर आणले आहे. या अपघाताप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल न करण्यात आल्याने विरोधक सरकारवर टीका करत असतानाच राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या नवीन वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

उमेश पाटील यांनी मंगळवारी अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. त्यावेळी बोलातना, खरंतर प्रचंड असं दुःख आहे दादा शिवाय पाडवा हे खरंतर पटतच नाही. पाडव्याचा सण म्हणजेच काटेवाडी होतं काटेवाडीला दादांना भेटायचं हाच आमचा पाडवा असायचा. पाडव्याला साहेबांना दादांना भेटण्यासाठी महाराष्ट्रातून प्रचंड लोक येत होते.दादांची उणीव ही कायमस्वरूपी जाणवत राहणार आहे. मागच्या शंभर वर्षात आणि पुढच्या शंभर वर्षात असा नेता होणार नाही, असे उमेश पाटील म्हणाले.

दादांचा अपघात नाही, घातपातच

दादांचा हा अपघात आहे की घातपात आहे याच्या विषयी सातत्याने मांडणी केली जाते. मला तर असं वाटतं तो घातपात आहे, असे उमेस पाटील म्हणाले. ते का वाटतं कसं वाटतं याच्यावर भरपूर चर्चा झाली आहे. देव त्याला माफ करणार नाही. हा सगळा तळतलाठ ज्याने कोणी केला असेल त्याच्या सात पिढ्यांना भोगावे लागेल, असा इशारा ही उमेश पाटील यांनी दिला.

शरद पवार यांना राष्ट्रवादीचे आमदार भेटणार का?

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांना भेटणार आहेत यावर काय वाटतं? या प्रश्नावर त्यांनी तडफेने उत्तर दिले. कुणी माहिती दिली ते मला सांगा कुठल्या आमदाराने माहिती दिली. आमच्याकडचे कुठले आमदार म्हटले आहेत का हे मला सांगा. मीच तुम्हाला प्रश्न विचारत आहे कुठले आमदाराने तुम्हाला सांगितला आहे का. कुठल्याही चॅनेल कुठल्याही आमदाराने सांगितला आहे का. कुणी ट्विट केला आहे का कोणी ऑफ द रेकॉर्ड बोलला आहे का ते तरी सांगा. याचा अर्थ कोणीच बोलल नाही तुम्हीच ठरवायचं. तुम्हीच ठरवायचं पवार साहेबांना आमदार भेटणार आहेत आणि विलिनीकरणाची चर्चा करणार आहेत. आमच्या आमदारांच्या मनामध्ये विलीनीकरणाबाबत काय आहे हे आम्हाला माहिती आहे. आमदारांच्या मनामध्ये जे असतं तसं नेता पुढे जात असतो. आमदारांच्या मनामध्ये काही असतं तर आमची पावले त्या दिशेने पडली असती, असे उमेश पाटील म्हणाले.

दोन्ही राष्ट्रवादीत विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही

दोन्ही राष्ट्रवादीत विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, असा दावा त्यांनी केला. आता माध्यमांमध्ये नव्या बातम्या चालवल्या जातायत. विलिनीकरणाची चर्चा आम्ही थांबवली, मात्र त्यात तथ्य नाही. वैयक्तिक भेटिगाठीला विलिनीकरण असा संदर्भ दिला जात आहे. विलिनीकरणाची गोष्टी सुरुच नव्हती त्यामुळे ती थांबली सांगायला अर्थच नाही, असे उमेश पाटील म्हणाले.

रामदास कदम यांना काय सल्ला?

रामदास कदम यांनी पुराव्याशिवाय बोलू नये. त्यांच्या कडे पुरावे असतील तर त्यांनी बोललं पाहिजे. कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादीचा जुना संघर्ष आहे. जुन्या संघर्षातून हे बोलले का ? मात्र रामदास कदम यांनी जबाबदारीने बोललं पाहिजे. त्यांनी या आधी पण वक्तव्य केली आहेत. मात्र त्यांनी पक्षाला अडचणीत आणण्याच काम केल आहे. रामदास कदम ज्येष्ठ आहेत त्यांनी त्यांचा आदर कायम ठेवला पाहिजे, असे उमेश पाटील म्हणाले.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?