AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis: आमच्याशिवाय विलिनीकरण… राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाविषयी देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis On NCP Merger: सध्या दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यात दोनदा भेट झाली. तर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

Devendra Fadnavis: आमच्याशिवाय विलिनीकरण... राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाविषयी देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाविषयी देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
| Updated on: Nov 10, 2026 | 1:26 PM
Share

Devendra Fadnavis On NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणाला पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीगाठी सत्राने चर्चा वाढलेली आहे. अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, पार्थ पवार यांनी त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्यात दीर्घ चर्चाही झाली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होत आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोठं वक्तव्य केलं आहे.

आमच्याशिवाय विलिनीकरण नाही

अजितदादा पवार आणि सुनेत्राताई पवार यांच्या कामाच्या पद्धतीत फरक आहे असे सांगत एका अनौपचारिक गप्पात फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाविषयी मोठे भाष्य केले. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी जी भूमिका मांडली होती. तीच त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. विलिनीकरणाविषयी सुनेत्रा पवार सांगू शकतात. पण आमच्याशिवाय राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या एकत्रि‍करणात अजून नवीन ट्विस्ट आल्याचे दिसून येत आहे.

शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढू

मराठवाडा, विदर्भासह राज्यातील 304 तालुके दुष्काळाच्या गडद छायेत आहेत. दुष्काळाची पकड आणखी घट्ट होत आहे. सरकारने 5,000 रुपयांची दुष्काळी अग्रिम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. त्याचवेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह काही मंत्र्यांनी दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला. त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या. दुष्काळाची दाहकता दिवसागणिक वाढत आहे. काल परवाच मुख्यमंत्र्यांनी दिवाळीत शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. आता शेतकर्‍यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढू, दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवेंद्र फडणवीसांचे मोठे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांना दुष्काळातून सुखरुप बाहेर काढू. पाण्याच नियोजन केलं आहे, सरकार योग्य पातळीवर उपाययोजना करत आहे. अनौपचारिक गप्पांच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं. आपल्याला जनावरे आणि फळबाग पण टिकवायच्या आहेत. शेतकर्‍यांना दुष्काळातून सुखरूप बाहेर काढू. पाण्याच नियोजन केलं आहे. सरकार योग्य पातळीवर उपाययोजना करत आहे. अनौपचारिक गप्पांच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी असं वक्तव्य केलं.

आपल्याला जनावरे आणि फळबाग पण टिकवायच्या आहेत. एकेका गावातून आपण पाण्याचा साठा मागवला आहे मोठ्या धरणात पाणी साठा चांगला आहे, त्याचा वापर आपण चांगला करू. जेणेकरून पाण्याची समस्या दूर होईल. चारा पिकासाठी आपण सवलती देणार आहोत. पाणी आणि चारा या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. अग्रिम मदत दिली आहे. आता अंतिम मदत लवकरच देणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण