Rohit Pawar: ‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर…’, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून रोहित पवार यांचे सूचक ट्विट, वेगळी वाट धरणार?
Rohit Pawar on NCP Merger: शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मोठे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर टोकाची भूमिका घेतल्याचे दिसून येते. त्यांनी ट्विट करत त्यांचे खणखणीत मत व्यक्त केले आहे. त्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Rohit Pawar on NCP Merger: गेल्या काही दिवसांपासून थंडबस्त्यात पडलेला राष्ट्रवादी विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा तापला आहे. शरद पवार हे आजारी असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली आणि एकत्रिकरणाचा मुद्या ऐरणीवर आला. ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बैठकांचा धडाका लावला. दोन्ही राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या भेटीला आले. पार्थ पवार हे दोनदा भेटायला आले. या घडामोडींमुळे भाजपच्या स्क्रीप्टवर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पहिल्या अंकाचा पडदा उघडणार असल्याचा दावाही विश्लेषक करत आहेत. त्याचवेळी आमदार रोहित पवार यांनी मात्र वेगळा सूर आळवला आहे.
विलीनीकरणाचा पक्षात कोणताही चर्चा नाही
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चेवर सोमवारी रोहित पवार यांनी मोठी प्रतिक्रिया दिली होती. आमची चर्चा व्यक्तीगत, आरोग्य, दुष्काळाबाबत होती. त्याव्यतिरिक्त इतर कोणतीही चर्चा मी केली नाही. विलिनीकरणाबाबत तेही काही बोलले नाही, मीही काही बोललो नाही. अजित पवारांच्या अपघाता बाबत आम्हाला शंका तपास संथ गतीने सुरु आहे., तपास वेगाने पुढे जात नाहीये. त्यामुळे सत्ताधारी योग्य दिशेनी तपास करत नाही अशी आमची शंका आहे. १५ नोव्हेंबरला महत्वाचं प्रजेंटेशन करणार आहे. महत्त्वाच्या बाबी त्यातून आपल्या समोर येणार आहे. राज्यातल्या ९० टक्केहून अधिक लोकांना हा अपघात नाही. घातपात असं वाटतं, जरा FIR ही होत नाहीये समजा. महाराष्ट्रात भाजप, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कोणी बोलत असेल.तर मी बोलत आहे, विलिनीकरणाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आणि अजितदादांच्या पक्षात सुरू आहे. आमच्या पक्षात तशी कोणतीही चर्चा नाही, असा दावा त्यांनी काल केला होता.
‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची,’ या आशयाची व्हाटसॲपवर आलेली ही रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे.
नक्की ऐका…! https://t.co/CGGqVIRKdN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 10, 2026
सूचक ट्विटची मोठी चर्चा
‘सत्य हेच तुमचं कर्म असेल, तर अपयशाची हिंमत नाही तुम्हाला रोखण्याची,’ या आशयाची व्हाटसॲपवर आलेली ही रचना अत्यंत अर्थपूर्ण, प्रेरक आणि संघर्षाला बळ देणारी आहे. नक्की ऐका असं आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. या सूचक ट्विटमधून त्यांनी मोठा संदेश दिल्याचे मानले जात आहे. त्यांच्या या ट्विटमधून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठा निर्णय होणार का? ते वेगळी वाट निवडतात की काय, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
