AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Padwa Recipe: दिवाळी पाडव्याला नवऱ्याला द्या गोड सरप्राइज! घरच्या घरी बनवा स्वादिष्ट केशर-बदाम खीर, सोपी आहे रेसिपी

Diwali Padwa Sweet Recipe: दिवाळी पाडव्याला नवऱ्यासाठी काहीतरी खास पदार्थ बनवायचा विचार करत असाल ही केसर बदामची खीर बनवू शकता. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे.

Padwa Recipe: दिवाळी पाडव्याला नवऱ्याला द्या गोड सरप्राइज! घरच्या घरी बनवा स्वादिष्ट केशर-बदाम खीर, सोपी आहे रेसिपी
दिवाळी पाडव्याला नवऱ्याला द्या गोड सरप्राइजImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Nov 10, 2026 | 12:14 PM
Share

दिवाळीतील पाडवा हा नवरा-बायकोच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा अधिक घट्ट करणारा खास सण आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. तर पतीही पत्नीला भेटवस्तू देऊन तिच्याप्रती प्रेम व्यक्त करतो. त्यामुळे हा दिवस आणखी खास बनवण्यासाठी एकमेकांसाठी काहीतरी गोड आणि आवडीचे बनवण्याची संधी असते. तुम्हीही यंदाच्या पाडव्याला नवऱ्यासाठी काहीतरी खास गोडधोड बनवण्याचा विचार करत असाल, तर केशर-बदाम खीर हा उत्तम पर्याय ठरू शकतो. केशरचा सुगंध, बदामाचा कुरकुरीतपणा आणि दुधाचा छान गोडवा यामुळे ही खीर अगदी शाही लागते. विशेष म्हणजे, ही खीर बनवण्यासाठी जास्त मेहनतही घ्यावी लागत नाही. चला तर मग, जाणून घेऊया केशर-बदाम खीर बनवण्याची सोपी रेसिपी

केसर बदाम खीर बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे…

– दूध – तांदूळ – साखर – केशर – बदाम – वेलची पावडर

केसर बदाम खीर बनवण्याची पद्धत

ही खीर बनवण्यासाठी प्रथम तांदूळ भिजवून घ्या. तांदूळ किमान १ तास भिजत ठेवा. असे केल्याने खीर लवकर तयार होते. आता एका भांड्यात दूध गरम करा. हे दुध मंद आचेवर उकळू द्या. आता एका वाटीत थोडे कोमट दूध घेऊन त्यात केशर कुस्करून घ्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात केशर घाला. काही वेळाने दुधात केशरचा छान रंग आल्यावर त्यात भिजवलेले तांदूळ घाला. हे आता चांगले शिजू द्या. एकीकडे खीर बनवत असताना दुसरीकडे बदाम भाजून घ्या. काही बदाम बारीक वाटून घ्या. बाकीचे बदाम बारीक चिरून घ्या. खीर शिजल्यावर त्यात साखर घाला. असे केल्यावर खीरमध्ये थोडे पाणी दिसू लागेल. अशा परिस्थितीत ते पुन्हा चांगले उकळा. घट्ट झाल्यावर त्यात बदामाची पूड घालून मिक्स करा. तयार झाल्यावर गॅस बंद करून खीरला बारीक चिरलेल्या बदामांनी सजवा. तुमची टेस्टी केसर बदाम खीर तयार आहे.

लक्षात ठेवा या टिप्स

• केशर आधी कोमट दुधात भिजवून ठेवा. यामुळे खिरीला छान रंग आणि सुगंध येतो. • खीर घट्ट आणि मलईदार होण्यासाठी फुल क्रीम दुधाचा वापर करा. • दूध भांड्याला लागू नये म्हणून खीर अधूनमधून ढवळत राहा. • खीर शिजताना शेवटी वेलची पूड घालू शकता. यामुळे स्वाद वाढतो. • सर्व्ह करताना बदाम, पिस्ता आणि केशराच्या काड्यांनी गार्निश करा. • खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता. थंड खीर हवी असल्यास फ्रिजमध्ये ठेवा.

Follow Us
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली