AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: लाज वाटली पाहिजे, अशी हिंमत दुसऱ्या धर्मात.., ‘रामायणा’तील त्या सीनवर मुकेश खन्ना भडकले, निर्मात्यांना चांगलंच सुनावलं

Ramayana: 'रामायण' सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे, तर दुसरीकडे सिनेमातील काही सीन वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. ज्यावर मुकेश खन्ना यांनी निराशा व्यक्त करत, निर्मात्यांना चांगलंच सुनावलं आहे.

Ramayana: लाज वाटली पाहिजे, अशी हिंमत दुसऱ्या धर्मात.., 'रामायणा'तील त्या सीनवर मुकेश खन्ना भडकले, निर्मात्यांना चांगलंच सुनावलं
| Updated on: Nov 10, 2026 | 12:07 PM
Share

Ramayana: अभिनेता रणबीर कपूर स्टारर ‘रामायण’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सिनेमाच्या काही सीन्सवर आक्षेप देखील घेतला जात आहे. सिनेमाच्या प्रत्येक सीनवर प्रेक्षक आत प्रतिक्रिया देत आहेत. सिनेमात अभिनेत्री साई पल्लवी माता सीता यांच्या भूमिकेत दिसत असून, सिनेमात तिच्यावर एक ॲक्शन सीन चित्रित करण्यात आला आहे. ज्यावर आता ‘महाभारत’ फेम अभिनेते मुकेश खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीनवर निशाणा साधत त्यांनी सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलंच सुनावलं आहे, व्लॉगमध्ये मुकेश खन्ना यांनी म्हटलं आहे, वाल्मीकी रामायणात माता सीतेला एक योद्धा म्हणून चित्रित केलेले नाही. चित्रपट निर्मात्यांनी हा सिनेमा पूर्णपणे स्वतःच्या कल्पनेतून घडवला आहे. अत्यंत खेदजनक बाब ही आहे…

मुकेश खन्ना म्हणतात, ‘वाल्मीकी रामायणात असं कुठेच नाही जिथे माता सीता युद्ध करत आहेत. त्या मर्यादा पुरुषोत्तम यांच्या पत्नी होत्या. ज्यांनी सेवाभाव दाखवला… पतीसोबत वनवास स्वीकारला, सीतेने देखील कधी राज दरबार मागितला नाही. सीता कधीच योद्धा नव्हत्या. जर त्या योद्धा असत्या तर, अपहरण करणाऱ्या रावणासोबत लढल्या असत्या. निर्मात्यांनी सांगितलं आहे की, हा सीन त्यांनी अद्भुत रामायणातून घेतला आहे… अशात मला विचारायचं आहे की, हे अद्भुत रामायण काय आहे? सत्य रामायण वाल्मिकी यांनी लिहिलं होतं..’

‘निर्मात्यांनी अशी हिंमत दुसऱ्या धर्मात करुन दखववावी. तुम्ही कुरान, बायबलसोबत छेडछाड करु शकता? तर आपल्या गीता, रामायण सोबत छेडछाड कशा प्रकारे करु शकता? सीतेला युद्ध करताना कसं दाखवू शकता? सीतेच्या भूमिकेला पूर्णपणे वेगळं दाखवण्यात आलं आहे. असं देखील मुकेश खन्ना म्हणाले.

निर्मात्यांना फटकारताना मुकेश खन्ना म्हणाले, त्यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे. “आमच्या श्रद्धेशी अशा प्रकारे खेळण्याचं कारण काय?” असा सवाल त्यांनी केला. मुकेश खन्ना यांनी यश आणि रणबीर कपूर यांच्यात केल्या जाणाऱ्या तुलनेवरही भाष्य केले. त्यांच्या मते, यशला अधिक प्रशंसा मिळत आहे कारण निर्मात्यांनी कथा अशा प्रकारे लिहिली आहे की, त्यात रावणाचं उदात्तीकरण स्पष्टपणे दिसून येतं. सिनेमात रावणाला रामापेक्षा श्रेष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.’, अनेकांनी सीनवर नाराजी व्यक्त केली असली तर, सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे विक्रम ब्रेक करताना दिसत आहे.

Follow Us
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
Delhi Weather : दिल्लीत वायू प्रदूषणाची पातळी गंभीर; आजचा AQI किती?
गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, कोण होणार नवा कारभारी?
Gokul : गोकुळच्या अध्यक्षपदाचा आज फैसला, 29 सदस्य करणार मतदान; चार सरकारी सदस्यांची मतं स्वतंत्र ठेवणार, कोण होणार नवा कारभारी?
पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर..
Pune : पुण्यात प्रदूषणाचा कहर, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 249 वर; दिवाळीनंतर हवेची गुणवत्ता खालावली