ना नोकरीचं टेन्शन, ना बॉसचा ओरडा! अवघ्या वयाच्या 30 व्या वर्षी तरुणाने घेतली रिटायरमेंट, कसं आखलं नियोजन?
चीनमध्ये एका तरुणाने वयाच्या 30 व्या वर्षी रिटायरमेंट घेतली. या तरुणाने काही वर्ष मेहनत केली. त्यानंतर आता आरामाचे आयुष्य जगत आहे.

नोकरी म्हटलं तर सकाळपासून रात्री झोपेपर्यंत एक वेगळंच चक्र सुरू असते. नोकरी म्हटलं तर काही ताण तणाव सहन करत जगत असतात. तर काहींना अनेकदा बॉसचा ओरडा देखील खावा लागला आहे. तर काहींच्या नोकरीची सुरुवातच ही वयाच्या 30 व्या वर्षी सुरू होते. परंतु चीनमधील एका तरुणाची जोरदार चर्चा होत आहे. चीनमधील एक तरुणाने चक्क वयाच्या ३० व्या वर्षी नोकरीतून निवृत्ती घेतली आहे. या तरुणाच्या निवृत्तीची जोरदार चर्चा होत आहे.
चीनमधील या तरुणाने कमाईतून 14 फ्लॅट खरेदी केले. त्यानंतर सर्व फ्लॅट भाड्याने दिले. यातून मिळणाऱ्या कमाईतून हा तरुण आयुष्य जगत आहे. अनेक जण वयाच्या 30 व्या वर्षी नोकरी, घर खरेदी करतात. परंतु या तरुणाने 30 व्या वर्षी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तरुणाचे नाव हे फॅन जुनजी असे आहे. हा तरुण चीनच्या के जिलीन भागात राहतो. तो नोकरीसाठी हुनान प्रांतातील चांगशा शहरात पोहोचला होता. त्याने इंटरनेट हेल्थकेअर सेल्स क्षेत्रात नोकरी केली. त्याने दिवसाच्या 24 तासांपैकी 18-18 तास नोकरी केली. या नोकरीमुळे आयुष्यात आलेल्या ताण तणावाने वैतागला होता. त्यामुळे त्याने नोकरीवर अवलंबून राहणे सोडून देण्याचा निर्णय घेतला.
फॅन याने मोठ्या शहरात फ्लॅट घेण्याऐवजी चांगशा शहरात जुने फ्लॅट खरेदी करण्यावर भर दिला. त्याला जुने फ्लॅट कमी किमतीत मिळतील, याचा अंदाज होता. त्यामुळे यातून कमाई होऊ शकते, असे त्याला वाटलेलं. चांगशामधील काही जुन्या फ्लॅटसाठी डागडुजी करून 3 लाख युआन (45 हजार डॉलर/ 42 लाख 2 हजार रुपये) खर्च आला. रिपोर्टनुसार, फॅनने 2023 ते 2026 या तीन वर्षांच्या कालावधित 14 फ्लॅट खरेदी केले. त्याने 14 फ्लॅटच्या खरेदीसाठी 20 लाख युआन( जवळपास 3 लाख डॉलर) हून अधिक खर्च केले. त्याने काही छोटे फ्लॅट देखील खरेदी केले. बहुतेक फ्लॅट हे चांगशा या भागात आहे. त्याने दोन फ्लॅट स्वत:साठी ठेवले आहेत. तर 12 फ्लॅट हे भाड्याने दिले आहेत. त्याने काही फ्लॅट 1.5 लाख युआनला देखील खरेदी केले. त्याचं महिन्याला 1700 युआन इतकं भाडे मिळते. त्याच्या एका महागड्या फ्लॅटची किंमत ही 2.45 लाख इतकी आहे. यामुळे जवळपास 2200 युआन इतके भाडे मिळते. त्याला 12 फ्लॅटमधून महिन्याला 17800 युआन भाडे मिळते. फॅनला वर्षभरात 12 फ्लॅटच्या माध्यमातून 2.13 लाख युआनची कमाई होते. या कमाईतून तो आरामात आयुष्य जगत आहे. एकंदरीत फॅन हा भारतीय चलनानुसार जवळपास वर्षाला 25 लाखांची कमाई करतो.
