AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MS Dhoni : धोनी आणि साक्षीचे दिवाळीतील रोमँटिक फोटो व्हायरल; धोनीने IPL 2027 च्या कमबॅकबद्दलही दिली मोठी माहिती

धोनी सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, त्यामुळे त्याचे असे कौटुंबिक फोटो पाहायला मिळाले की चाहत्यांना प्रचंड आनंद होतो. दिवाळीच्या फोटोंसोबतच त्याने IPL 2027 मधील कमबॅकबद्दलही महत्त्वाची माहिती दिली आहे.

MS Dhoni : धोनी आणि साक्षीचे  दिवाळीतील रोमँटिक फोटो व्हायरल; धोनीने IPL 2027 च्या कमबॅकबद्दलही दिली मोठी माहिती
MS DHONI DIWALI PHOTOImage Credit source: SOCIAL MEDIA
| Updated on: Nov 10, 2026 | 1:33 PM
Share

दिवाळीचा सण आला कि चाहत्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटींच्या घरातील सेलिब्रेशनचे फोटो पाहण्याची उत्सुकता असते. त्यात जर क्रिकेटरच्या घरातील दिवाळीचे फोटो असतील तर ते आणखीनच खास असतात. यंदा धोनीची पत्नी साक्षीने देखील सोशल मीडियावर दिवाळीतील फोटो शेअर केले, त्यात धोनीचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळाला, पाहता पाहता हे फोटो सोशल मीडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

साक्षीने इन्स्टाग्रामवर दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये धोनी हलक्या हिरव्या रंगाच्या कुर्त्यामध्ये दिसत आहे. तर साक्षी काळ्या रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये दिसत आहे. एका फोटोमध्ये साक्षी धोनीच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसते. तर दुसऱ्या फोटोत दोघेही एकत्र हसताना दिसतात. तर एका फॅमिली फोटोमध्ये त्याची मुलगी जीवा देखील आहे. या पोस्टसोबत चाहत्यांना हॅप्पी दिवाळी म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत.

चाहत्यांसाठी दिवाळीची खास भेट

धोनी सहसा सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसतो, त्यामुळे त्याचे असे कौटुंबिक फोटो पाहायला मिळाले की चाहत्यांचा आनंद काही वेगळाच असतो. साक्षीच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी फोटो शेअर केल्याबद्दल साक्षीचे आभार मानले आहेत. तर काहींनी माहीचे आणखी फोटो शेअर करण्याची विनंती केली आहे.

IPL 2027 मध्ये माही खेळणार की नाही?

एकीकडे धोनीच्या दिवाळीत फोटोंची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्याच्या IPL च्या निर्णयाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. चेन्नई सुपर किंग्सचा हा अनुभवी खेळाडू IPL 2026 चा एकही सामना खेळू शकला नव्हता. दुखापतीमुळे त्याला संपूर्ण हंगामाला मुकावं लागलं होतं. त्यामुळेल आता तो पुढच्या हंगामात परतणार का? हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

फिटनेस पाहून निर्णय घेणार

धोनीने अलीकडेच बंगळूरूमधील एका आरोग्यविषयक कार्यक्रमात IPL 2027 मध्ये खेळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. पुढील हंगामात खेळायचं की नाही हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे त्याने सांगितलं

Follow Us
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण