AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Devendra Fadnavis : ‘..मग शासनाचे चार संचालकच पाठवले नसते’, गोकुळची निवडणूक सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आतली गोष्ट

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गोकुळवर चार शासन नियुक्त संचालक पाठवण्याच्या मुद्यावर महत्वाची माहिती दिली आहे. गोकुळ मध्ये आत्ता अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

CM Devendra Fadnavis : '..मग शासनाचे चार संचालकच पाठवले नसते', गोकुळची निवडणूक सुरु असताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आतली गोष्ट
CM Devendra Fadnavis
| Updated on: Nov 10, 2026 | 1:32 PM
Share

सध्या गोकुळची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये गोकुळ संदर्भात महत्वपूर्ण भाष्य केलं आहे. “गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे आहे. गोकुळ संदर्भात आधीही सांगितलं, एक प्रकारे वैधानिक पेच निर्माण झाला. एका गटाचे 13 तर दुसऱ्याचे 12 सदस्य झाले. कोरम पूर्ण होत नव्हता, एकाच्या भरवशावर अध्यक्ष होऊ शकत नव्हता. सरकारला वाटलं असतं निवडणुकीनंतर लगेच संचालक टाकले असते. डीडीआर पण असतो. मात्र कोरमसाठी बहुमत नाही हे लक्षात आल्यावर निर्णय झाला आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळसाठी चार शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावर सांगितलं. “उच्च न्यायालयात काल अध्यादेशात डिफेक्ट नाही असं सांगितलं. चार जणांची मतं वेगळी ठेवा आणि इलेक्शन पूर्ण करा असं सांगितलं. खुलेपणाने सांगितले होतं, सतेज पाटील आणि मुश्रीफ यांनी एकत्र येत निर्णय केला असता तर संचालक पाठवले नसते” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“मात्र राजकीय रंग दिला गेला. राहुल गांधी देखील त्यात उतरले. मी संस्थेच्या पाठीशी आहे. सहकाराच्या क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना गोकुळ मध्ये नेमले आहेत. एक गायनॅकोलॉजिस्ट असेल तर त्यात चूक काय?. आता देशाच्या विरोधी पक्षनेत्याला जर लक्ष घालावे लागत आहे तर गायनॅकोलॉजिस्ट तर साधा माणूस आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “कायद्याच्या मागे मी आहे. कोणा एका व्यक्तीच्या मागे नाही. कोणताही एक गट सत्ता सथापन करू शकत नाही अशी स्थिती आली. जर सरकारला करायचं असतं लगेच केलं असतं. दोघांकडे कोरम नसल्याने सरकारने निर्णय घेतला” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

एवढं राजकारण केलं जात आहे

“आता प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. एवढं राजकारण केलं जात आहे. यात राहुल गांधी सुद्धा उतरले” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सुरु. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राजेश पाटील तर समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील उमेदवार. 1.10 मिनिटांनी अध्यक्षपदाची अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार. अर्ज मागे घेण्यासाठी 12.25 ते 12.55 म्हणजे तीस मिनिटांचा वेळ.

Follow Us
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण