AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ramayana: 33 किलोंचा पोशाख, 1.8 किलोचा मुकुट; असा घडवला ‘रामायणा’तील रावणाचा लूक

Ramayana: डोक्यावर एवढ्या वजनाचा मुकुट घालून शूटिंग करणं खूप कठीण होतं. मात्र, यशने कोणतीही तक्रार न करता हे आव्हान स्वीकारलं. त्याच्या चेहऱ्यावर किंवा अभिनयात या त्रासाचा परिणाम दिसू नये, याची त्याने काळजी घेतली.

| Updated on: Nov 10, 2026 | 1:30 PM
Share
'केजीएफ' चित्रपटातून संपूर्ण देशात लोकप्रिय झालेला अभिनेता यश सध्या 'रामायण' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या भव्य चित्रपटात यश रावणाची भूमिका साकारत आहे. रणबीर कपूर रामाच्या भूमिकेत असला तरी यशच्या रावणाच्या लूकने आणि अभिनयाने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे.

1 / 7
मात्र, पडद्यावर दिसणाऱ्या या भव्य रावणाच्या लूकमागे यशला किती मेहनत घ्यावी लागली, याचा खुलासा आता चित्रपटाच्या कॉस्च्युम डिझायनरने केला आहे. यशने रावणाच्या भूमिकेसाठी तब्बल 33 किलो वजनाचे कपडे आणि दागिने परिधान केले होते. तर त्याच्या मुकुटाचे वजनही तब्बल 1.8 किलो होतं.

2 / 7
'रामायण' चित्रपटाची कॉस्च्युम स्टायलिस्ट आणि डिझायनर सानिया सरधारिया यांनी यशच्या रावणाच्या लूकमागील मेहनतीचा खुलासा केला आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, यशचं बहुतांश पोशाख आणि दागिन्यांचे वजन साधारणपणे 16 ते 20 किलो इतकं होतं. मात्र, काही खास प्रसंगांसाठी तयार करण्यात आलेल्या पोशाखांचे वजन तब्बल 30 ते 33 किलोपर्यंत होतं.

3 / 7
यामध्ये लंकेचा राजा म्हणून रावणाचा लूक, त्याच्या लग्नातील पोशाख आणि शूर्पणखेच्या लग्नाच्या प्रसंगातील पोशाखांचा समावेश होता. हे सर्व पोशाख अत्यंत भव्य आणि आकर्षक पद्धतीने तयार करण्यात आले होते. मात्र, एवढे वजनदार कपडे परिधान करून तासन्तास शूटिंग करणं यशसाठी नक्कीच आव्हानात्मक होतं.

4 / 7
रावणाच्या लूकमधील सर्वात आव्हानात्मक गोष्ट म्हणजे त्याचा मुकुट. सानिया यांनी सांगितलं की, मुकुटाचं वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. त्यासाठी थ्रीडी मॉडेल्सही तयार करण्यात आले होते. आधी मुकुटाची रचना निश्चित करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे वजन कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, अनेक प्रयत्नांनंतरही मुकुटाचं वजन 1.8 किलोपेक्षा कमी करता आलं नाही.

5 / 7
रावण हा सोन्याच्या लंकेचा राजा असल्यामुळे त्याचा लूक अतिशय श्रीमंत आणि भव्य दिसावा, यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली. 'ट्राइब अम्रपाली'चे क्रिएटिव्ह डायरेक्टर तरंग अरोरा यांनीही रावणाच्या दागिन्यांबाबत माहिती दिली आहे. रावणाच्या दागिन्यांमध्ये साप, राक्षसांचे चेहरे, प्राण्यांचे चेहरे आणि त्रिशूळ अशा विविध प्रतिकांचा वापर करण्यात आला आहे. रावण हा भगवान शंकराचा भक्त असल्यामुळे त्याच्या दागिन्यांमध्ये शिवभक्तीची झलकही दाखवण्यात आली आहे.

6 / 7
सानिया सरधारिया गेल्या अकरा वर्षांपासून यशसोबत काम करत आहेत. मात्र, 'रामायण' हा त्यांचा पहिलाच पौराणिक चित्रपट आहे. यशने रॉकी भाईनंतर आता रावणाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणबीर कपूर, साई पल्लवी आणि रवी दुबे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचा पहिला भाग 5 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे.

7 / 7
Follow Us
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?
आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले
Satej Patil : आज गोकुळचा अध्यक्ष  ठरणार आमदार सतेज पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; प्रताप सरनाईकांनी घेतली...
Pratap Sarnaik Meets Sanjay Raut : गोकुळच्या सत्तासंघर्षात मोठी घडामोड; मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली संजय राऊतांची भेट, भेटीमागचं कारण काय?
ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
Thane : ठाण्यात रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर 2 महिन्यांची बंदी; तरीही...
भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
Manoj Jarange : भाऊबीजेसाठी बोलावलं नाही, पण...; मनोज जरांगेंचं वक्तव्य चर्चेत
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल...
Pandharpur Vitthal Temple : पाडव्याच्या शुभमुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर फुलांनी सजलं; तब्बल २ टन फुलांची आकर्षक सजावट, दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण
Gokul : गोकुळचं अध्यक्षपद शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे जाणार? चर्चांना उधाण