AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कपडे डिटर्जंटच्या पाण्यात किती वेळ भिजवून ठेवताय? जाणून घ्या काही खास टिप्स

कामाच्या धावपळीमध्ये जास्त वेळ कपडे धुण्यासाठीच जातो. कारण अनेक जण आधी कपडे भीजत ठेवतात. पण डिटर्जंटच्या पाण्यात किती वेळ कपडे ठेवले पाहिजे, हे माहिती असणं देखील महत्त्वाचं आहे... तर जाणून घ्या कपडे धुण्याचे काही खास टिप्स..

कपडे डिटर्जंटच्या पाण्यात किती वेळ भिजवून ठेवताय? जाणून घ्या काही खास टिप्स
| Updated on: Nov 10, 2026 | 3:05 PM
Share

आज वॉशिंग मशीन अनेकांच्या घरी असतेच. पण मशिनने धुवण्याऐवजी हाताने धुतलेले अनेकांना आवडतात. पण यामुळे काही कपडे खराब होण्याची शक्यता देखील अधिक असते. पण हाताने धुण्यापूर्वी, ते कपडे काही वेळ डिटर्जंटच्या पाण्यात भिजवतात. यामुळे घाण, डाग आणि घामाचा वास निघून जाण्यास मदत होते. पण बहुतेक लोकांना हे माहीत नसतं की कपडे पाण्यात किती वेळ भिजवावेत आणि ते धुण्याची योग्य पद्धत कोणती आहे. ही एक चूक कपड्यांचा दर्जा खराब करू शकते आणि डाग काढू शकते. म्हणून, कपडे डिटर्जंटमध्ये किती वेळ भिजवावेत आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

कपडे धुण्यापूर्वी डिटर्जंटच्या पाण्यात किती वेळ भिजवून ठेवावेत ?

साधारणपणे, कपडे डिटर्जंटच्या पाण्यात 15 ते 30 मिनिटं भिजवणं पुरेसं असतं. यामुळे कपड्यावरील सामान्य घाण आणि घामाचे डाग सैल होण्यास मदत होईल. कपड्याच्या प्रकारानुसार, किती वेळ कपडे डिटर्जंटमध्ये टाकले पाहिजे यासाठी देखील काही नियम आहेत.

सुती कापडे असतील तर, साधारणपणे 15 ते 30 मिनिटं भिजवून ठेवावेत. जीन्स आणि जाड कपडे असतील आणि ते खूपच घाणेरडे झाले असतील, तर त्यांना सुमारे 20 ते 30 मिनिटं भिजवणं पुरेसे आहे. एवढंच नाही तर, गडद रंगाचे कपडे काही वेळ भिजवून ठेवा आणि ते इतर रंगीत कपड्यांपासून, विशेषतः पांढऱ्या कपड्यांपासून वेगळे ठेवा.

कपडे डिटर्जंटच्या पाण्यात जास्त वेळ भिजवून ठेवल्यास काय होते ? कधीकधी आपण कपडे डिटर्जंटच्या पाण्यात तासनतास भिजत ठेवतो. हे चांगले नाही. डिटर्जंटच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने काही कपड्यांचा रंग फिका पडू शकतो. ही समस्या विशेषतः गडद रंगाच्या आणि प्रिंटेड कपड्यांमध्ये दिसून येते. शिवाय, याचा परिणाम नाजूक कापडाच्या तंतूंवरही होऊ शकतो. जास्त वेळ पाण्यात ठेवल्याने घाण वास देखील येतो. त्यामुळे, कपडे रात्रभर डिटर्जंटच्या पाण्यात भिजत ठेवणे टाळणेच उत्तम.

कपडे धुताना या गोष्टी लक्षात ठेवा :

पांढरे, रंगीत आणि गडद रंगाचे कपडे एकत्र भिजवू नका.

जास्त डिटर्जंट वापरल्याने तुमचे कपडे स्वच्छ होणार नाहीत. डिटर्जंट पावडरचा वापर पॅकेजवरील सूचनांनुसारच करा.

कपड्यांवर चहा, तेल किंवा भाजीपाल्याचे डाग असल्यास, ते वेगवेगळे स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा.

भिजवल्यानंतर, कपड्यांवर कोणताही डिटर्जंट शिल्लक राहणार नाही याची खात्री करण्यासाठी स्वच्छ पाण्याने चांगले धुवा.

कपडे धुताना गरम पाणी वापरणे टाळा. यामुळे कपड्यांचा रंग लवकर फिका पडू शकतो. तसेच, कपडे जास्त वेळ उन्हात वाळवणे टाळा.

Follow Us
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची...
NCP मध्ये नव्या राजकीय समीकरणांची नांदी? काटेवाडीत पवार कुटुंबाची महत्त्वपूर्ण बैठक
प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
दिवाळीच्या फराळातून जपले मैत्रीचे नाते! प्रताप सरनाईक थेट संजय राऊतांच्या घरी, भेटीचे कारण काय?
गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, सतेज पाटील 24 तारखेला....
Gokul : गोकुळच्या सत्तासंघर्षात आज निर्णायक दिवस, मुश्रीफांचा महायुतीच्या विजयाचा दावा; सतेज पाटील 24 तारखेला पुढची भूमिका ठरवणार
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; राजेश पाटील..
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदासाठी महायुतीचा मोठा निर्णय; बड्या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब!
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने...
अजित पवारांच्या घटनेवरून अंबादास दानवे आक्रमक; FIR दाखल न झाल्याने सरकारला घेरलं!
गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे..
Gokul : गोकुळ अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी 14 सदस्यांचा कोरम आवश्यक; महायुतीकडे 16 सदस्यांचं संख्याबळ, अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा?
संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया...
Pratap Sarnaik On Sanjay Raut : संजय राऊत यांच्या भेटीनंतर मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाले?
शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान
Sanjay Raut On Shinde Sena : शिंदे गटात दोन शिंदे आहेत, तुम्ही शोधा संजय राऊतांचं सूचक विधान; राऊत असं का म्हणाले?