AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुफान वाजणार, क्लब ते पार्टी गाजवणार, Gen Z चं पहिलं ट्रेंडिंग साँग आलं, वाचा कुठे ऐकता येणार?

New Song For Gen Z : टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांचं जेन झीसाठी खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तुफान वाजणार, क्लब ते पार्टी गाजवणार, Gen Z चं पहिलं ट्रेंडिंग साँग आलं, वाचा कुठे ऐकता येणार?
| Updated on: Nov 10, 2026 | 10:25 PM
Share

आजकाल सोशल मीडिया, शिक्षण, नोकरी, फॅशन किंवा मनोरंजन अशा प्रत्येक क्षेत्रात ‘Gen Z’ या पिढीची जोरदार चर्चा सुरू असते. बदलत्या काळानुसार तरुणाईची विचार करण्याची पद्धत, जीवनशैली आणि आवडीनिवडीही बदलत आहेत. सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या गोष्टींपासून ते पार्टीमधील गाण्यांपर्यंत Gen Z चा स्वतःचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळतो. याच नव्या पिढीचा मूड लक्षात घेऊन आता एक खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कामाने वेगळं स्थान निर्माण करणारे टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनीच हे गाणं लिहिलं आहे. त्यांनीच या गाण्याला संगीत दिलं असून गायनही त्यांनीच केलंय. त्यामुळे प्रदर्शनाआधीच या गाण्याची सगळीकडे तुफान चर्चा रंगली आहे.

‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ गाण्याची चर्चा!

‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ असं या नव्या गाण्याचं नाव आहे. नावाप्रमाणेच या गाण्यात Gen Z चा अंदाज, प्रेमाची भावना आणि आजच्या तरुणाईची भाषा अनुभवायला मिळेल. विशेष म्हणजे, पार्टीमध्येही हमखास वाजेल आणि तरुणाईला थिरकायला लावेल, अशा स्वरूपाचं हे गाणं आहे. ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ हे गाणं उद्या 11 नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता रीलिज होणार आहे.

उमेश कुमावत यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन

या गाण्याचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे टीव्ही9 मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी या गाण्याचं लेखन केलं आहे. इतकंच नाही तर गाण्याचं संगीत संयोजन अर्थात कम्पोझिशनही त्यांचंच आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेश कुमावत यांचा हा संगीत क्षेत्रातील वेगळा प्रयोग ठरणार आहे.

Gen Z च्या आवडीला साजेसं नवं गाणं

आजच्या तरुणाईला आकर्षित करणारी गाणी, नवं संगीत आणि हटके शब्दांची विशेष क्रेझ आहे. सोशल मीडियावर एखादं गाणं ट्रेंड झालं की, ते काही वेळातच तरुणाईच्या प्लेलिस्टमध्ये स्थान मिळवतं. या गाण्यातही तरुणाई, जेन झींमध्ये वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा चपखलपणे वापर करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे हे गाणं सोशल मीडियावरही तुफान चर्चेत येणार, असा विश्वास व्यक्त केला जातोय. बॉलिवुडमध्ये सर्रास ऐकायला येणाऱ्या नेहमीच्या रटाळ म्यूझिकची बंधनं तोडून ‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ या गाण्याला तरुणाईला प्रेमात पाडणारं संगीत देण्यात आलंय.

‘यू आर ट्रेंडिंग इन माय हार्ट’ हे गाणं युट्युबवर प्रदर्शित होणार आहेच, पण त्याचसोबत स्पॉटिफाय, गाना, ऍपल म्युजिक, जिओ सावन या म्युजिक प्लॅटफॉर्मवरही ऐकायला मिळणार आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?