AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai DCC Bank Election: पाडव्याचा मुहूर्त, शिंदेंनी डाव टाकला; भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रणनिती; पडद्यामागे काय घडतयं?

भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने  मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पडद्यामागे नेमकं काय घडतंय?

Mumbai DCC Bank Election: पाडव्याचा मुहूर्त, शिंदेंनी डाव टाकला; भाजपचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी रणनिती; पडद्यामागे काय घडतयं?
| Updated on: Nov 10, 2026 | 9:19 PM
Share

Mumbai DCC Bank Election:  एकत्र सत्तेत असूनही एकमेकांविरोधात आरोप- प्रत्यारोपाची राळ उडवणारी भाजप-शिवसेना आता निवडणुकीतही आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्षांमध्ये सामना होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या मुंबई जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने  मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पडद्यामागे नेमकं काय घडतंय? जाणूुन घ्या सविस्तर…

मुंबई जिल्हा बँक निवडणुकीसाठी शिंदेंची मोर्चेबांधणी! 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई जिल्हा बँक निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने स्वतंत्र लढवण्यासाठी चाचपणी सुरु केली आहे. याचसंदर्भात आज पाडव्याच्या मुहूर्तावर शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली. बाळासाहेब भवन येथे झालेल्या बैठकीमध्ये उपसभापती सचिन आहिर, उपमहापौर संजय घाडी, मंगेश सातमकर आदी नेत्यांसह मुंबईमधील विभागप्रमुख तसेच शाखाप्रमुखही उपस्थित होते.

एकीकडे ही बैठक सुरु असतानाच मोठी घडामोड घडली. शिंदेंच्या नेत्यांची बैठक सुरु असतानाच संजय घाडींच्या पत्नी संजना घाडींनी सहकार पॅनलचे सिद्धार्थ कांबळें यांची भेट घेतली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते प्रविण दरेकर, शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर आदी नेते उपस्थित होते. या मोठ्या घडामोडींमुळे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ताकद लावल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते प्रवीण दरेकर आणि त्यांच्या समर्थकांचे मुंबई जिल्हा बँकेवर वर्चस्व आहे. सध्या या बँकेच्या संचालक मंडळात 20 सदस्य आहेत. आमदार प्रसाद लाड, तेजस्विनी घोसाळकर यांच्यासारख्या भाजप नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांचाही संचालक मंडळात समावेश आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनीही ताकद लावल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?